Uddhav Thackeray & PM Narendra Modi: उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मविआचा प्रयोग ही मोठी चूक असल्याची कबुली दिल्याचा दावा दीपक केसरकर यांनी केला होता. उद्धव ठाकरे आता खोटं बोलतायत.

 

हायलाइट्स:

  • हिंदुत्त्वाची विचारधारा सोडण्याचा माझा निर्णय योग्य नव्हता
  • मी महाराष्ट्रात जाऊन ही चूक सुधारणार आहे
मुंबई:उद्धव ठाकरे २०२१ साली दिल्लीत गेले होते तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलताना, ‘महाविकास आघाडीसोबत जाऊन मी चूक केली’ अशी कबुली दिल्याचा दावा शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे. उद्धव ठाकरे दिल्लीत गेले होते तेव्हा त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी पंतप्रधान मोदींशी बोलताना म्हटले होते की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करुन माझी चूक झाली. एनडीएची साथ सोडून महाविकास आघाडी स्थापन करण्याचा माझा निर्णय चुकला. मुंबईत जाऊन मी ही चूक सुधारणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र, मुंबईत परतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काहीच केले नाही, असे दीपक केसरकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते.
उद्धव ठाकरेंकडून सहकाऱ्यांच्या विरोधातच कारस्थान; ४ नेत्यांची नावे घेत शिंदेंचा खळबळजनक दावा
आम्ही उद्धव ठाकरे यांना हेच सांगत होतो की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी असलेली युती तोडा. आपण सर्व पुन्हा एकत्र येऊ. आम्ही उद्धव ठाकरे यांना फसवलेले नाही. तेच आम्हाला निघून जा बोलले. पण आता ते जनतेसमोर खोट्या गोष्टी सांगत आहेत. उद्धव ठाकरे यांनी जनतेशी तरी खोटं बोलू नये, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.

केसरकरांच्या दाव्यानुसार उद्धव ठाकरे मोदींसमोर नेमकं काय बोलले?

दोन वर्षांपूर्वी दिल्लीत उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन माझी चूक झाली. हिंदुत्त्वाची विचारधारा सोडण्याचा माझा निर्णय योग्य नव्हता. मी महाराष्ट्रात जाऊन ही चूक सुधारणार आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचा दावा केसरकर यांनी केला. पण उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना दिलेले वचनही तोडले. राज्यातील जनतेला समजले पाहिजे की, तुम्ही कोणाला फसवले आहे. आम्ही असं काही करु शकलो ही देवाची कृपा आहे. उद्धव ठाकरे त्याचा फायदा घेऊ शकले नाहीत. ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंना फसवलेले नाही. उद्धव ठाकरे स्वत:च्या अपयशाचं खापर दुसऱ्यांच्या डोक्यावर का फोडत आहेत? महाराष्ट्रासाठी तुम्ही आमच्यासोबत आला असता तर आज वेगळं चित्र असतं, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here