अभय पाटील (३५), प्रविण बळीराम (२५) व राहूल माने (२३)अशी तिघा मित्रांची नावं आहेत. पोलिसांनी या तिघांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली. या प्रकरणामध्ये आणखी काहीजण असल्याची शंका पोलिसांना आहे. या घटनेचा उलगडा होताच सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. आंबोली घाटात झालेल्या सुशांत खिल्लारे याच्या हत्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अनेक धक्कादायक खुलासे केले.
पोलिसांनी तुषार पवार या आणखी एका आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडून सर्व प्रकार उघडकीस आला. ‘आर्थिक देवाण घेवाणीतून खिल्लारे याचं अपहरण केलं, त्याला कराड इथल्या एका अज्ञात ठिकाणी नेलं. सर्वजण आम्ही पार्टी करण्यासाठी बसलो आणि नंतर सगळ्यांनी त्याला मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. यावेळी भाऊसो माने यांच्यासह मिळून आम्ही मित्र अंबोली घाटात गेलो आणि पुढे त्याला ढकलताना भाऊसोचाही तोल जाऊन तो दरीत कोसळला. यानंतर आम्ही तेथून निघून गेलो’ असं तुषार याने पोलिसांना सांगितलं.
आईला केला होता शेवटचा फोन…
सुशांत खिल्लारे याने २९ जानेवारीला आपल्या आईला शेवटचा फोन केला होता. आई आपण त्यांचे पैसे दिले नाहीतर ते माझा जीव घेतील असं सुशांतने आईला सांगितलं. खिल्लोरे याचे नातेवाईक या घटनेनंतर पोलिसात गेले आणि या घटनेबद्दल माहिती दिली.

नेमकं काय घडलं…
भाऊसो माने तरुणाने सुशांतला ३ लाख रुपये दिले होते. पण ते पैसे सुशांत परत करू शकला नाही. त्यामुळे भाऊसो याने मित्रांसोबत प्लॅन केला आणि सुशांतचं अपहरण केलं. सगळे मित्र पार्टीसाठी बसले आणि अचानक त्यांनी सुशांत बेदम मारहाण करायला सुरुवात केली. कमरेतला पट्टा काढून सुशांतला इतकं मारलं की हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर भाऊसो माने त्याच्यासह त्याचे अनेक मित्र सुशांतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोली घाटात गेले.
सुशांत याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना भाऊसो याचाही तोल गेला आणि तो देखील दरीत कोसळला. ज्याने मित्राचा खून केला त्यालाच दरीत ढकलताना भाऊसोचाही जीव गेल्याने सगळ्या मित्रांमध्ये खळबळ उडाली. एक व्यक्ती दरीत कोसळला असल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पण त्यातून नंतर उघड झालं हे धक्कादायक हत्याकांड….
याबाबत उपविभागीय अधिकारी सोळंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात संशयित पवार याची कसून चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर काही गोपनिय व्यक्तींकडून मिळालेल्या माहीतीनुसार पुढील चौकशी करण्यात आली. यात काही सिसिटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या सर्व चौकशीत या प्रकरणात या तिघांचा थेट सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. चौकशी दरम्यान त्यांनी आपण हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात आली आहे.
शीतल म्हात्रे प्रकरण: अटक केलेल्या विनायकच्या आईला सुषमा अंधारेंची मिठी, आपुलकीच्या शब्दात समजूत