Mumbai Daughter killed mother chopping body | लालबाग परिसरात घडलेल्या हत्याकांडाने एकच खळबळ उडवून दिली होतील. हे प्रकरण गेल्या काही वर्षांतील मुंबई पोलिसांसमोरील आव्हानात्मक केस मानली जात आहे.

 

Lalbaug Murder case Rimple Jain
लालबाग हत्याकांड

हायलाइट्स:

  • लालबागच्या इब्राहिम कासिम चाळीतील घटना
  • मुलीने केले आईच्या मृतदेहाचे तुकडे
  • मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग
मुंबई: लालबागच्या पेरुबाग कंपाउंडमध्ये राहणाऱ्या रिंपल जैन हिने आपल्या आईची निर्घृणपणे हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. शहराच्या मध्यवर्ती भागात अशी घटना घडूनही तीन महिने कोणालाही त्याचा थांगपत्ता नव्हता. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. गेल्या आठवडभरात पोलिसांनी या हत्याप्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत. याच तपासाचा एक भाग मुंबई पोलिसांनी रिंपल जैन हिला लालबाग परिसरातील हार्डवेअरच्या दुकानात नेले होते. याठिकाणी पोलिसांनी रिंपलने हार्डवेअरच्या दुकानातून नक्की काय खरेदी केले, याचा सविस्तर तपशील नोंदवून घेतला.
घरात पाऊल ठेवताच उग्र दर्प; आईचं धड पिशवीत, हातपाय स्टीलच्या टाकीत; लालबाग हत्याकांडाची स्टार्ट टू एंड कहाणी
रिंपलने वीणा जैन यांच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले होते. हे सर्व तुकडे रिंपलने तब्बल तीन महिने घरातच दडवून ठेवले होते. आईच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी रिंपलने सुरा, विळा आणि फरशी कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिनचा वापर केला. मुंबई पोलिसांनी रिंपलच्या घरातून दोन सुरे आणि विळा जप्त केला होता. पोलिसांनी रिंपलला हार्डवेअरच्या दुकानात नेऊन तिने सर्व हत्यारं कधी विकत घेतली, याची सविस्तर माहिती घेतली. याशिवाय, रिंपलने मृतदेह कापण्यासाठी एकूण किती हत्यारं खरेदी केली होती, याची माहितीही घेण्यात आली. रिंपलने आईची हत्या केल्याचा आरोप नाकारला आहे. माझी आई पहिल्या मजल्यावरील शौचालयात जात असताना चाळीच्या व्हरांड्यातून खाली पडली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. या सगळ्याचा आळ आपल्यावर येईल या भीतीने मी घाबरून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले, असे रिंपलने यापूर्वीच पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणात ६ ते ७ जणांचे जबाव नोंदवले आहेत.

सलमान खानला पुन्हा धमकी, गॅलेक्सीबाहेर मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली

वीणा जैन यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या हत्याप्रकरणातील उर्वरित गोष्टी उलगडण्याची शक्यता आहे. वीणा जैन यांचा मृत्यू आजारपणामुळे झाला की पहिल्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे त्यांचा जीव गेला, याबाबत पोस्टमार्टेम रिपोर्टनंतर स्पष्टता येऊ शकते.
Lalbaug Murder Case: लालबाग हत्याकांडात नवा ट्विस्ट, चायनीजच्या दुकानातील वेटर्सची पोलिसांना धक्कादायक माहिती
लालबागच्या पेरुबाग कंपाउंड येथील इब्राहिम कासिम चाळीत हा सर्व प्रकार घडला होता. काळाचौकी पोलिसांनी १४ मार्चला रिंपल जैनला अटक घेतली होती. त्यावेळीच पोलिसांनी वीणा जैन यांच्या मृतदेहाचे कपाटात आणि स्टीलच्या टाकीत ठेवलेले तुकडे घराबाहेर काढले होते. हे सर्व दृश्य अंगावर अक्षरश: काटा आणणारे होते. ही चाळ लालबागसारख्या अत्यंत गजबजाट असलेल्या परिसरात आहे. अगदी मुख्य रस्त्याला लागून असणाऱ्या या चाळीत असे काही घडेल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. त्यामुळेच पोलिसांनी चाळीतील घरातून वीणा जैन यांच्या मृतदेहाचे पिशवीत ठेवलेले तुकडे बाहेर काढल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here