पुणे : पुण्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे चोरीचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. जुनी दुचाकी खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन चोरट्यांनी टेस्ट ड्राइव्ह करण्याच्या बहाण्याने गाडी नेली आणि तसेच ते पसार झाले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नसून विक्रेत्याकडून दुचाकीचा शोध सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आळेफाटा येथे जुन्या गाड्या खरेदी विक्री करण्याचे किशोर बयस यांचे दुकान आहे. रविवारी दुपारी जुनी गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने दोघा संशयितांनी दुचाकी विक्रेत्याकडून टेस्ट ड्राईव्हसाठी (एम.एच १४ एचएन ७६३३) ठेवली होती. दोघा संशयित भामट्यांनी तेथे उभ्या असलेल्या सर्व दुचाकी पाहिल्यानंतर हिरो डेस्टिनी स्कूटर पसंत केली. यावेळी दोन चोरट्यांनी इंजिन तपासणीसाठी किशोर बयस यांच्याकडे दुचाकी टेस्ट ड्राईव्हला नेण्यासाठी चावी मागितली. यावेळी किशोर बयस यांनी त्यांना आपण कुठले विचारले असताना जवळचेच असल्याचे सांगितले. त्यावेळी किशोर बायस यांनी तळघरात असलेल्या दुकानातून दुचाकी काढून टेस्ट ड्राईव्हला नेण्यासाठी चावी दिली.

आईला संपवणाऱ्या लेकीला एकाच गोष्टीची भीती; पहाटे ४ ते मध्यरात्री २ पर्यंत घरात काय घडत होतं?

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

मात्र, संबधित दोघे संशयित भामट्यानी दुचाकी टेस्ट ड्राईव्हला घेऊन गेले मात्र बऱ्याचवेळ झाला परत आलेच नाही. त्यांना याबाबत संशय आल्याने आपली दुचाकी पळवून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. बयस यांनी आळेफाटा पोलिसांना याबाबतची माहिती दिली असून अद्याप याबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांकडून सनगण्यात आले आहे. मात्र खरेदी-विक्री व्यावसायिक किशोर बयस यांचा दुचाकीचा शोध सुरु होता.

५ लाख रुपये दे, अन्यथा २४ तासात गेम करु, व्यापाऱ्याला धमकी, लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं व्हाट्सअप कॉल

आळेफाटा खरेदी-विक्रीचे मोठे मार्केट असून येथे यापूर्वी विक्रीसाठी उभ्या असललेल्या अनेक छोट्या-मोठ्या वाहनांची चोरी झाली आहे. त्यातील अनेक वाहनांचा अद्याप शोध लागला नाही. मात्र आता संशयित भामट्यांनी नवी शक्कल वापरून दुचाकी लंपास केली आहे. या घटनेने आळेफाटा वाहन खरेदी-विक्री व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दुचाकी नेणारे हे दोन्ही चोरटे सीसीटिव्ही कैद झाले असून लवकर त्यांना पकडण्यात यश येईल अशी चर्चा परिसरात होती.

ठाण्याच्या माजी नगरसेवकाचा साताऱ्यात गोळीबार; ही काय मोगलाई आहे का? अजितदादा संतापले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here