जळगाव : जळगाव शहरातील समता नगरातील १९ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास समोर आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाल हिरालाल सोनवणे (वय १९ वर्ष, रा. समता नगर, जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून मुलाच्या आत्महत्येने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

जळगाव शहरातील समता नगर येथे विशाल सोनवणे हा तरूण आपल्या आई, आजी व मोठा भाऊ गौतम यांच्यासोबत वास्तव्याला होता. मजूरीचे काम करून तो कुटुंबाला उदरनिर्वाहात हातभार लावत होता. रविवारी मोठा भाऊ कामावर तर इतर सर्व कुटुंबीय बाहेर गेले होते. घरी एकट्या असलेल्या विशाल याने दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

दुपारी विशाल याचा मोठा भाऊ गौतम सोनवणे हा कामावरून घरी आला. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा ठोकून तसेच आवाज देवून ही आतून कुणीही प्रतिसाद देत नव्हते. अखेर गौतम यास शंका आल्याने त्याने दरवाजा तोडल्यानंतर त्याला त्याचा लहान भाऊ विशाल याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

पप्पांनी पंखे पुसताना सूसू केली, चिमुकल्याने दादाला सांगितलं; नंतर समजलं बँक मॅनेजरने गळफास घेतला
भावाचा मृतदेह पाहून गौतमसह त्याच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला होता. विशाल याने आत्महत्या का केली, त्याचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.

सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?

याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत विशाल याच्या पश्चात आई, भाऊ, आजी असा परिवार आहे. घरात सर्व काही सुरळीत असताना विशालने अचानक एवढ्या टोकाचे पाऊल का उचलल या विचाराने त्याच्या आत्महत्येच्या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

मला चांगल्या पगाराची नोकरी, पण मन लागत नाही; पिंपरीत २७ वर्षीय अभियंत्याने आयुष्य संपवलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here