नवी दिल्ली : युरोप आणि जगभरातील प्रसिद्ध बँक बुडण्यापासून वाचवण्यासाठी क्रेडिट सुइस वाचवण्यासाठी स्वित्झर्लंडने सर्व प्रयत्न केले, पण आज ते व्यर्थ ठरताना दिसत आहे. बाजार उघडण्यापूर्वी वृत्त समोर आले की UBS ने बँक सुमारे ३.२५ डॉलरमध्ये विकत घेण्याचा करार केला आहे. यामुळे स्वित्झर्लंडमधील सर्वात मोठी बँक, क्रेडिट सुईसला काहीसा दिलासा मिळेल, असे मानले जात होते. पण आज बाजार उघडताच क्रेडिट सुइसचा शेअर ६३ टक्क्यांनी खाली कोसळला. यामुळे बँकेचा तारणहार बनलेल्या USB च्या शेअर्सवरही झाला. बाजार उघडताच यूबीएसचे शेअर्सही १४% घसरले. म्हणजेच क्रेडिट सुईसची मदत करण्यासाठी पुढे आलेल्या यूबीएसला महागात पडलं आहे. त्यामुळे जागांवरील बँकिंगचे संकट आणखी गडद झाले आहे.

लक्षात घ्या की स्वित्झर्लंडच्या या दोन्ही बँकांचा जागतिक प्रणालीगत महत्त्वाच्या बँकांच्या यादीत समावेश आहे. म्हणजेच, या अशा बँका आहेत ज्यांच्या डबघाईने जगाच्या आर्थिक व्यवस्थेत कहर निर्माण होऊ शकतो.दरम्यान, अमेरिकेतील बँकिंग संकटने आधीच चिंता वाढवली आहे. सिलिकॉन व्हॅली बँक बुडल्यानंतर सिग्नेचर बँकही बंद पडली. यासोबतच फर्स्ट रिपब्लिक बँकही बुडण्याच्या वाटेवर आहे. एवढेच नाही तर एका अहवालानुसार अमेरिकेतील १८६ बँका कोसळण्याच्या मार्गावर आहेत.

अमेरिकेच्या दोन बँक दिवाळखोरीत, भारतीय बँकेत तुमचा पैसा सुरक्षित आहे का? RBI गव्हर्नर म्हणतात…
जगभरातील शेअर बाजारात खळबळ
आज स्विस मार्केट उघडताच क्रेडिट सुइसचे शेअर्स ६३% घसरले. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता कंपनीचे शेअर्स ५८.६९ टक्के तोंडाशी आपटले. तर याचा परिणाम यूबीएसच्या शेअर्सवर दिसून आला आणि ते ९.६१% घसरून व्यवहार करत होते. दरम्यान, बँकिंग संकट आणि मंदीच्या भीतीमुळे शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजार लाल चिन्हात बंद झाले, ज्याचा परिणाम आज आशियाई बाजारावर दिसून आला.

आतापर्यंत 25 कोटी कामगारांना फायदा करून देणारी ‘ई-श्रम’ योजना

जपानचा निक्केई दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. जपानमध्ये बँकिंग निर्देशांक १.८८% घसरला, तर या महिन्यात त्यात आतापर्यंत १३.६ टक्क्यांनी घसरण झाली आहे. याशिवाय भारतातही बीएसई सेन्सेक्स आज ३६१ अंक घसरून ५७,६२८.९५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

अमेरिकेतील संकट TCS, इन्फोसिसच्या दारावर पोहोचलं; आता आणखी मोठा धोका
भारतीय शेअर बाजाराची वाटचाल
बीएसई सेन्सेक्सवर बजाज फिनसर्व्हचा शेअर सर्वाधिक ४.२५% घसरून बंद झाला. तर बजाज फायनान्समध्ये ३.०१ टक्क्यांची घसरण दिसून आली. तसेच विप्रो २.४६%, टाटा स्टील २.३८%, टाटा मोटर्स १.९६% आणि इंडसइंड बँक १.९० टक्क्यांनी घसरले. याशिवाय एसबीआय, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस, टीसीएस, मारुती, पॉवरग्रीड, रिलायन्स इंडस्ट्रीजचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स, लार्सन अँड टुब्रो, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेल देखील घसरून बंद झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here