लालबागमधील इब्राहिम कासीम चाळीत वीणा आणि रिंपल वास्तव्यास होत्या. या परिसर अतिशय गजबजलेला आहे. मायलेकी राहत असलेली चाळ मुख्य रस्त्याला लागून आहे. चाळीतले रहिवासी मध्यरात्री २ पर्यंत जागे असायचे. तर चाळीखाली असणारी दुकानं, हॉटेल्स, टपऱ्या पहाटे चार वाजताच सुरू व्हायच्या. त्यामुळे आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणं रिंपलला शक्य झालं नाही.
२७ डिसेंबरला वीणा पहिल्या मजल्यावरून खाली पडल्या. रिंपलनं आईची हत्या केल्याचा आरोप आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी रिंपलनं जवळच असलेल्या बाजारातून मार्बल कटर आणला. वीणा जैन कोणालाच दिसत नव्हत्या. शेजारी त्याबद्दल रिंपलकडे विचारणा करायच्या. त्यावर आई उपचारांसाठी कानपूरला गेल्याची बतावणी रिंपलनं केली.
सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?
रिंपलच्या घरातून येत असलेल्या दुर्गंधीमुळे संशय वाढत चालला होता. त्यामुळे रिंपलनं वेगळंच नाटक सुरू केलं. शेजाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून रिंपल घरासमोरच्या कॉमन पॅसेजमध्ये फिरायची. तिच्या कानाला फोन असायचा. आपण आईशी बोलत आहोत, असं ती दाखवत होती. दूर गेलेल्या आईसोबत आपण दररोज गप्पा मारतो, असं चित्र तिनं शेजाऱ्यांसाठी उभं केलं.