पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौर्णिमा ही त्यांच्या घरामध्ये झोका खेळत होती. तिने लोखंडी पाइपला साडी बांधली होती. या साडीमध्ये बसून ती झोका खेळत होती. त्याचवेळी खेळता-खेळता अचानक तिची मान साडीमध्ये अडकून तिच्या गळ्याला फास लागला. तिने आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार कुटुंबियांच्या निदर्शनास आला.
ऊसतोड कामगाराच्या ५ वर्षांच्या लेकरानं अखेर बोअरवेलमध्येच जीव सोडला; एनडीआरएफचे आठ तासांचे प्रयत्न निष्फळ
यानंतर कुटुंबियांनी तिच्या मानेचा फास सोडवून तिला तातडीने वडूज (ता. खटाव) येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तडवळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शंकर पोपट फाळके (वय ४०, रा. तडवळे, ता. खटाव, जि. सातारा) यांनी वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला पोलीस हवालदार एस. एल. वाघमारे तपास करत आहेत.