नदीत सापडलेला धातू सोनं असून तो हिंदू राजांच्या खजिन्याचा भाग आहे. हिंदू राजांच्या काळातला खजिना नदीच्या प्रवाहात बुडाला होता, असं एका स्थानिकानं सांगितलं. स्थानिक आदिवासी मजूर परिसरात सोन्याचा शोध घेत आहेत. सोन्याचं भांडार हाती लागेल या हेतूनं आसपासचे ग्रामस्थ तीन दिवसांपासून नदीपात्राजवळ शोधाशोध करत आहेत. बिरभूम जिल्हा प्रशासन आणि भारतीय पुरातत्त्व विभागाला याची माहिती देण्यात आली आहे.
सोन्याचे तुकडे सापडतील या आशेनं ग्रामस्थ नदीकिनारी जमले आहेत. सोन्याच्या नाण्यांप्रमाणे दिसणाऱ्या अनेक वर्तुळाकार वस्तू काही ग्रामस्थांना सापडल्या आहेत. सोन्याची नाणी झारखंडला लागून असलेल्या महेशपूर राजबाडीची असल्याचं स्थानिकांना वाटतं. राजबाडी किंवा कूचबिहार पॅलेसला ऐतिहासिक महत्त्व आहे. राजबाडीची उभारणी १८८७ मध्ये महाराजा नरेंद्र नारायण यांच्या शासनकाळात झाली. याचं डिझाईन बकिंगहम पॅलेसच्या धर्तीवर करण्यात आलं आहे.
समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?
सोन्याची नाणी राजबाडीवरून सुवर्णरेखा नदीच्या माध्यमातून बांसलाई नदीत वाहत आल्याचा ग्रामस्थांचा कयास आहे. झारखंडमधील एकाला बांसलाई नदीत सोन्याचा हार सापडला होता, असाही दावा काहींनी केला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनानं हालचाली सुरू केल्या. ब्लॉक विकास अधिकारी जागृत चौधरींनी घटनेची माहिती मुरारई पोलीस ठाण्याला दिली. या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून नदीजवळ एक पोलीस अधिकारी तैनात करण्यात आला आहे.