man died after helmet glass entered his head, भरधाव वेगातील दुचाकी कंटेनरला धडकली; हँडल तुटलं, हेल्मेटची काच डोक्यात घुसली अन् घात झाला – man died in road accident at satara after the glass of helmet entered his head
सातारा: पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर वेळे तालुका वाई गावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला एका दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत दुचाकी चालकाचा दुर्दैंवी मृत्यू झाला आहे. या अपघातावेळी दुचाकी चालकाच्या डोक्यात हेल्मेट होते. अपघातापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा राज्यात हेल्मेट सक्तीही केली जाते. मात्र, याच हेल्मेटमुळे या दुचाकीस्वाराने जीव गमावला आहे.
या विचित्र अपघातात हेल्मेटची काच डोक्यात घुसल्याने या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. गिरीश कृष्णा नायडू (वय ४०, रा. सिटी लेन, खराडी पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. रविवार २० मार्चला हा अपघात घडला. १३ कोटींचा बंगला अन् महागड्या गाड्या; एक चूक अन् १०० कोटींचा मालक रस्त्यावर आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश नायडू हे पुण्याहून पाचगणीला निघाले होते. त्यावेळी वेळे येथे आल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक नादुरुस्त कंटेनर उभा होता. या कंटेनरला गिरीश नायडू यांच्या दुचाकीची मागून जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, नायडू यांच्या दुचाकीचे हँडल, चाक तुटले. अपघातावेळी त्यांच्या डोक्यात हेल्मेट होते. मात्र, याच हेल्मेटची काच डोक्यात घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दुचाकी स्वार वेगात असल्यामुळे दुचाकी कंट्रोल न झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला जाऊन जोरात धडकली. या अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नायडू यांना दवाखान्यात नेले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून, हवालदार तोरडमल तपास करीत आहेत.