जयपूर : संपूर्ण देशभरात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वीज अंगावर कोसळून अनेकांचे मृ्त्यू होत असल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं कहर केला आहे. त्यामुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पिकांचं देखील नुकसान झालं असून शेतकरी अडचणीत आले आहेत. काही ठिकाणी वीज अंगावर कोसळून अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये तिथं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील मालाखेडामध्ये धक्कादायक घटना घडली. फोनवर बोलत असलेल्या एका युवकाच्या अंगावर वीज पडली. यामध्ये त्याच्या फोनचा स्फोट झाला.

वीज पडल्यानं मोबाईलचा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता मोठी होती. युवकाचा कान गायब झाला आणि चेहरा देखील चित्रविचित्र झाला होता. या घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुणाचं नाव लोकेश चौधरी असून त्याचं वय २७ वर्ष होतं.

अलवर जिल्ह्यातील मालखेडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील बरखेडा गावाचा तो रहिवासी होता. तो मजुरी करायचा. त्याच्या गावात सुरुवातीला रिमझिम पाऊस पडत होता. अचानक मोठा आवाज झाला आणि लोकेशच्या जवळ वीज कोसळली. सुरुवातीला तो बचावला मात्र, त्याच्या फोनचा स्फोट झाला, यावेळी फोन त्याच्या कानाला लावलेला होता.

मुख्यमंत्र्यांसोबत यशस्वी चर्चा, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजनेबाबत मोठी अपडेट…

कानाजवळ मोबाइलचा स्फोट झाल्यानं त्याच्या कानातून रक्त येऊ लागलं. चेहऱ्याची अवस्था देखील न पाहण्यासारखी झाली होती. ज्या हातात फोन पकडलेला होता त्याला देखील इजा झाली होती. या घटनेत लोकेश चौधरीचा जागीच मृत्यू झाला. लोकेशच्या कुटुंबात त्याची पत्नी, दोन मुलं आणि आई यांचा समावेश आहे. आता त्यांच्या कुटुंबात कमवणारं कोणीचं राहिलं नाही.

भरधाव वेगातील दुचाकी कंटेनरला धडकली; हँडल तुटलं, हेल्मेटची काच डोक्यात घुसली अन् घात झाला

वीज चमकत असताना फोनवर बोलणं टाळणं गरजेचं

पावसाची स्थिती निर्माण होत असताना आकाशात वीज चमकत असताना फोनवर बोलणं युवकाच्या फोनवर वीज कोसळली. त्यात फोनचा स्फोट झाल्यानं युवकाचा मृत्यू झाला. पावसाच्या काळात वीज चमकत असताना झाडांच्या आडोशाल थांबल्यानं अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्कता बाळगणं आवश्यक आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला, पण मुख्यमंत्री विधिमंडळात काय म्हणाले बघा….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here