बैल आडवा आला व मोटरसायकल रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एम.एस.ई.बी. पोलवर जाऊन जोरदार धडकली. यावेळी वरवडे पोलीस पाटील विजय जोशी यांना सायंकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास खंडाळा येथे एक मोटरसायकलस्वार पडलेला दिसला. त्यांनी नजीक असलेल्या ग्रामस्थांना माहिती देऊन साहिल रामदास पालशेतकर यांच्या चारचाकी वाहनात मनोज शिवगण याला गाडीत बसवून उपचारासाठी तात्काळ प्राथमिक आरोग्य खंडाळा हलवले.
यावेळी मनोज शिवगण याची पत्नी प्राची शिवगण या खंडाळा प्राथमिक केंद्र येथे स्त्री परिचर म्हणून काम करीत असल्याचे सांगण्यात आले. त्या रात्र पाळीला ड्युटीला होत्या. त्यांनी तात्काळ मनोजला उपचारासाठी ओपीडीमध्ये नेले.
मनोजने आपल्या छातीत उजव्या बाजूला जोरदार दुखत असल्याचे व डोक्यामध्ये मुंग्या आल्याचे सांगितले. यावेळी त्याच्या नाकातून रक्त येत होते. डॉक्टरांनी त्याच्यावरती तात्काळ उपचार सुरू केले मात्र दुर्दैवाने उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.
लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त
मनोज हा अतिशय शांत व प्रेमळ स्वभावाचा होता. मालगुंड शिवगणवाडी येथील विविध सामाजिक कार्यक्रमात तो सहभाग घेत असे. मनोज याच्या अशा या दुर्दैवी अपघातातील मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास जयगड पोलीस करत आहेत.
Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News