मुंबई: ‘जिनके घर शीशेके बने होते है..वो दुसरो पे पत्थर नही फेका करते… समझनेवालों को इशारा काफी है,’ अशा शब्दात नेते, खासदार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी आधी ट्विट करून आणि नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या डायलॉगचा पुनरुच्चार केला. अभिनेते राजकुमार हे माझे आवडते अभिनेते आहेत. त्यांचे सिनेमे मी नेहमी पाहतो. आज सकाळीही त्यांचा सिनेमा पाहत होतो. त्यातील डॉयलॉग आवडला. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नये. काच फुटते. हमाम में सब नंगे होते है. त्यामुळे कुणी कुणावर बोट दाखवू नये. राजकारणात सर्वच जण काचेच्या घरात राहत असतात याचं भान ठेवलं पाहिजे, असं सांगतानाच अर्थात माझा हा रोख कुण्या पक्षावर नाही. समझनेवालों को इशारा काफी है, असं राऊत म्हणाले.

अभिनेता आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहे. जगभरात मुंबई पोलिसांचा नावलौकीक आहे. त्यामुळे पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा. याप्रकरणावर मी अधिक बोलू शकत नाही. कारण मी सरकारचा भाग नाही. याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तच अधिक भाष्य करतील. मी बोलू शकत नाही, असं सांगतानाच याप्रकरणावर मी बोलावं अशी अजून वेळ आलेली नाही, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा राजकारणासाठी उपयोग होऊ नये. बिहारच्या निवडणुका आहेत. पाच वर्षात काम केलं नसेल तर अशा मुद्द्याची गरज पडेल. पण नितीश कुमार यांनी चांगलं काम केलं असेल तर त्यांनी असल्या मुद्द्यांवर निवडणुका लढवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

अयोध्येत करोनाचा कहर
सध्या अयोध्येत करोनाचा कहर आहे. परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशाला करोनाच संसर्ग झाला आहे. यूपीतील एका मंत्र्याचं करोनाने निधन झालं. तीन मंत्री आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षालाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कमीत कमी लोकांनी जावून भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडावा असं मला वाटतं. अयोध्येत सुरक्षा रक्षकांपासून ते पुजाऱ्यांपर्यंत अनेकांना करोना झाला आहे. स्वत: उमा भारतीही जाणार नाहीत. वार्धक्य आणि करोनाच्या भीतीमुळे लालकृष्ण अडवाणीही जाणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंतरही अयोध्येत जाऊन पुजा करून येतील. निमंत्रण यायला ते काय लग्न आहे का? की एखादी वरात आहे? असा सवाल करतानाच राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार नसल्याचे स्पष्ट केलं.

अयोध्येसाठी आमचं योगदान मोठं आहे. आम्ही राम मंदिराचा पाया घातला नसता. बाबरी मशीद पाडली नसती तर आज अयोध्येत मंदिर झालंच नसतं. स्वत: आणि विश्व हिंदू परिषदही हे मान्य करते, असं सांगून राम मंदिराचं भूमिपूजन होत आहे. ही आनंदाची बाब आहे. त्यावरून आम्हाला राजकारण करायचं नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here