मुंबई : उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाने गेल्या काही दिवसांपासून झोडपलं आहे. आता या अवकाळी पावासाची मुंबईत एन्ट्री झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये, ठाण्यात आणि कल्याण डोंबिवलीत आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

मुंबईसह आजूबाजूच्या ठाणे आणि कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमध्ये रात्रीपासून ढग दाटले होते. यानंतर मुंबई पहाटे साडेपाच वाजेपासून पाऊस सुरू झाला. मुंबईसह उपनगरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाण्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईजवळ असलेल्या वसई-विरार पट्ट्यातही पाऊस पडतो आहे.

अवकाळी पावसाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला झोडपल्यानंतर आता राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला अवकाळी पावसाचा फटका बसतो आहे. या पावसाचा फटका सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या चारकरमान्यांना बसला आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडली आहे. सध्यातरी उपनगरीय लोकल ट्रेनची वाहतूक सुरळीत सुरू आहे.

मुंबईकरांनो, काळजी घ्या! करोना, इन्फ्लूएन्झाचे रुग्ण वाढले; संसर्ग आणखी वेगाने वाढण्याचा धोका
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी, बाजरीसह द्राक्ष, संत्रा, आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आता हा अवकाळी पाऊस मुंबईत बरसत आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमध्ये सकाळपासून सुरू आहे. आजची सकाळ पावसाने सुरू झाली असून अद्याप सूर्यदर्शन झालेले नाही. सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. पावसामुळे वातावरणात काहिसा गारवा निर्माण झाला आहे.

फक्त मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून संप मागे घेतला; सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया

आधीच मुंबईसह जवळपासच्या उपनगरांमध्ये संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अशातच अवकाळी पावसामुळे आजाराचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here