म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमध्ये सागरी किनारा मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून मरिन ड्राइव्हवरील काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी ड्रेनेज आउटफॉलचे काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी हा रस्ता बंद करून त्याऐवजी समांतर असलेला सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तुलनेने हा रस्ता अरुंद असल्याने वाहतूककोंडी होण्याची शक्यता वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली आहे. दक्षिण मुंबईत जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

सागरी किनारा बांधकाम एजन्सीने मरिन ड्राइव्हच्या दक्षिणेकडील ड्रेनेज आउटफॉलचे काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी सुमारे पाच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तारापोरवाला मत्स्यालय ते इस्लाम जिमखाना दरम्यानचा रस्ता बंद करण्यात आला असून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक जिमखान्याच्या बाजूने समांतर चालणाऱ्या सर्व्हिस रोडवरून सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र हा सर्व्हिस रोड अरुंद असल्याने ही वाहतूक संथ गतीने होण्याची शक्यता आहे.

क्षुल्लक कारणावरुन वाद, त्यानं धुणी धुण्याचा दगड उचलला अन् थेट बायकोच्या डोक्यात घातला…

हे आहेत पर्यायी मार्ग :

केम्प्स कॉर्नर, नाना चौक, ऑपेरा हाऊस, सैफी रुग्णालय, मरीन लाइन्स स्थानक, प्राप्तिकर कार्यालय, चर्चगेट जंक्शन, गोदरेज जंक्शन या मार्गे चर्चगेट तसेच दक्षिण मुंबई

पेडर रोड, आरटीआय जंक्शन, सेसिल जंक्शन, सुख सागर जंक्शन, (डावीकडे वळण) ऑपेरा हाऊस, सैफी रुग्णालय, मरिन लाइन्स स्थानक, प्राप्तिकर विभाग कार्यालय, चर्चगेट जंक्शन येथून दक्षिण मुंबईकडे जाण्यास मार्ग.

वाळकेश्वर, बँडस्टँड, विल्सन कॉलेज, विनोली चौपाटी, (डावीकडे वळण), ऑपेरा हाउस, सैफी रुग्णालय, मरिन लाइन्स स्थानक, प्राप्तिकर विभाग कार्यालयामार्गे दक्षिण मुंबई

मनपाची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार; छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here