मुलाच्या चिंतेत सलीम खान रात्रभर झोपू शकले नाहीत
सलमानच्या जवळच्या मित्राने सांगितले की, अभिनेत्याला देण्यात आलेली ही कडक सुरक्षा अजिबात आवडली नाही. या कठीण काळात संपूर्ण कुटुंब एकत्र आहे आणि कोणीही या कठीण काळात त्यांच्या चेहऱ्यावर भीती दाखवून देत नाहीये. एका जवळच्या मित्राने सांगितले की, सलमानचे वडील सलीम खानदेखील खूप शांत दिसत आहेत. परंतु, ज्या दिवसापासून सलमानला धमकी मिळाली त्या दिवसापासून ते शांत झोपू शकले नाहीत हे तर साऱ्यांनाच माहीत आहे.
सलमानने सुरक्षेवर घेतला आक्षेप
सलमान या सुरक्षेच्या विरोधात होता आणि त्याला अजूनही या सर्व गोंष्टींवर आक्षेप आहे. मित्राने सांगितले की, ‘सलमानला असे वाटते की या धमकीकडे जितके लक्ष दिले जात आहे तितकेच आपण धमकी देणाऱ्या व्यक्तीलाही महत्त्व देत आहोत. यामुळे गुंडांना असे वाटेल की ते त्यांच्या योजनेत यशस्वी झाले. सलमान खूप बेधडक आहे आणि तो अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाही. जेव्हा कोणती गोष्ट घडायची असेल तेव्हा ती घडेल, असे त्याचे म्हणणे आहे. मात्र कौटुंबिक दबावामुळे सलमानने त्याचे सर्व बाहेरील कामं आणि इतर प्लॅन रद्द केले आहेत. त्याने ‘किसी का भाई किसी की जान’चे पोस्ट प्रॉडक्शन ठरल्यावेळीच होणार आहे. कारण त्याला उशीर करून चालणार नाही.
सलमानला यापूर्वीही आल्या होत्या धमक्या
याआधीही सलमानला दोन ते तीनवेळा जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचं कळतं. २०१९ मध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला धमकी दिली होती. काही महिन्यांपूर्वी सलमानला धमकीचे पत्र पाठवण्यात आल्याचेही समोर आले होते, जे त्याचे वडील सलीम खान यांना मिळाले होते. त्यात लिहिले होते की, सिद्धू मूसेवाला सारखीच अवस्था तुझी आणि सलीम खान यांची होणार आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुढे आले असून या प्रकरणात तो सध्या भटिंडा तुरुंगात आहे.
अलीकडेच बिश्नोईने तुरुंगातून एक मुलाखत दिली होती, ज्यात त्याने सलमानला काळवीट मारल्याप्रकरणी माफी मागावी अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, असे सांगितले होते. ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि सैफ अली खान यांच्यावर काळवीटाची शिकार केल्याचा आरोप असल्याची माहिती आहे.