ही घटना ताजी असतानाच डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगरमध्ये असलेल्या ओमकार सोसायटीत साप असल्याची खबर मिळाली. ही माहिती कळताच सर्प मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथून ४ फुटांच्या धामण जातीच्या सापाची सुटका करण्यात आली. तर कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या नेकणीपाड्यातील एका गॅरेजमध्ये साप आढळून आला. सापाला पाहताच गॅरेजमधील मेकॅनिकसह वाहन दुरुस्ती करण्यासाठी आलेल्यांची घाबरगुंडी उडाली. सकाळी दहाच्या दरम्यान गॅरेज उघडल्यानंतर गॅरेजमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पॉजचे संस्थापक निलेश भणगे यांना माहिती दिली. भणगे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन सापाची सुटका करून त्याला ताब्यात घेतले. हा साप डुरक्या घोणस असून ते साधारणत: एक महिन्याचे पिल्लू आहे. भक्ष्य गिळल्याने हा साप त्याठिकाणी शांतपणे पडून होता. या सापाला मलंगगड पट्ट्यातील त्याच्या अधिवासात सोडणार असल्याचे निलेश भणगे यांनी सांगितले.
गुढीपाडव्याचा उत्साह; नऊवारी, फेटा, पारंपारिक लूक, डोंबिवलीत रणरागिणींची स्कूटर रॅली
पशू-पक्षांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम
शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यासह ठिकठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. याचा परिणाम जीवसृष्टीवर झाला. पशू-पक्षी बऱ्यापैकी हवालदिल झाले होते. जीव वाचविण्यासाठी पशू-पक्षांनी मिळेल तो आसरा घेतला होता. त्यामुळे साप बाहेर पडले असावेत, असा कयास पॉजचे संस्थापक निलेश भणगे यांनी व्यक्त केला.