म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ‘मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या ८४ किमीच्या रस्त्याच्या चौपदारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, डिसेंबर २०२३ पर्यंत ते पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. या महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल. दुसऱ्या मार्गिकेचे कामही लवकर पूर्ण करण्याचा संकल्प आहे’, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिले.

‘या महामार्गाच्या कामाला येत्या गुरुवारपासून गतीने सुरुवात करण्यात येईल. दोन कंत्राटदारांना हे काम देण्यात आले असून, सकाळ ते संध्याकाळ १० ड्रोनच्या माध्यमातून या कामावर लक्ष ठेवण्यात येईल. पूर्ण ताकदीने हे काम पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे’, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा ते राजापूर या रस्त्याचे चौपदरीकरण पूर्ण झाले असून, रत्नागिरी जिल्ह्यात परशुराम घाट रस्ता आणि डोंगराळ भागातील कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली.

दुचाकी चोरीची अनोखी शक्कल.. टेस्ट ड्राईव्हसाठी गाडी घेऊन गेले, तिकडेच गायब झाले, व्यावसायिक टेन्शनमध्ये

‘पनवेल ते इंदापूर या ८४ किमीच्या रस्त्याच्या कामात अनेक अडचणी आल्या होत्या. या अडचणीवर मार्ग काढण्यात आला आहे. या रस्त्यासाठी १०० टक्के भूसंपादन झाले. भूसंपादनाचे पूर्ण पैसे राज्य सरकारकडे जमा आहेत. रस्त्याच्या कामी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीच्या भरपाईबाबत काही कुटुंबांमधील अंतर्गत मतभेद संपुष्टात आल्यानंतर भरपाईची रक्कम संबंधितांना वाटप करण्यात येईल’, असे चव्हाण यांनी सांगितले.

आशिष शेलारांचा मालवणीत प्रश्न, रवींद्र चव्हाणांचं जशास तसं उत्तर

भाजप सदस्य प्रवीण दरेकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे भाई जगताप, रासपचे महादेव जानकर, भाजपचे निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी उपप्रश्न विचारले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here