नवी दिल्ली : सोन्याच्या भावाने सोमवारी करोनापश्चात काळातील आजवरच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. ‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’च्या वेबसाइटनुसार, १० ग्रॅमसाठी सोन्याचा भाव १४५१ रुपयांनी वाढून ५९,६७१ रुपयांवर गेला. तत्पूर्वी, २ फेब्रुवारीला सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्या वेळी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी ५८,८८२ रुपयांवर गेला होता.

अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील पेचाचे पडसाद म्हणून सोन्याचे भाव वाढले. सत्रांतर्गत व्यवहारांदरम्यान सोने ‘एमसीएक्स’वर ६०,४५५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेले. ‘आयआयएफएल सिक्युरिटीज’चे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या मते शेअर बाजारातील चढउतारांमुळे सोन्याचे भाव वधारत आहेत. त्यामुळे चालू वर्षाच्या अखेरीस सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी ६५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. ‘केडिया ॲडव्हायजरी’चे संचालक अजय केडिया यांच्या मते २०२०पासून सोन्याच्या भावात तेजी येण्यास सुरुवात झाली आहे. चालू वर्षात सोने ६२,००० रुपयांवर जाण्याची शक्यता असून, सद्य परिस्थिती पाहता ते ६४,००० रुपयांचीही पातळी पार करण्याची शक्यता आहे.

बुडत्याचा पाय आणखी खोलात, जगावरील बँकिंग संकट आणखी गडद; Credit Suisse बँकेबाबत मोठा अपडेट
‘सोन्यातील तेजी अर्थव्यवस्थेसाठी घातक’
कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक कोलिन शहा यांच्या मते गेल्या महिनाभरात सोन्याच्या किमतीत सात ते आठ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. ही तेजी प्रामुख्याने अमेरिकेतील बँकांच्या संकटामुळे आली आहे. ‘सोन्याच्या किमती वाढणे अर्थव्यवस्थेसाठी घातक असून, आगामी काळात वाटचाल संथ होण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर जगभरातील मध्यवर्ती बँका सोन्याचा साठा वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या उत्सवी कालखंडात किरकोळ स्तरावर सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगामी काही महिन्यांत सोन्याच्या भावात आणखी तेजी येण्याची शक्यता असून, हा धातू प्रति १० ग्रॅमसाठी ६१,००० रुपये ते ६२,००० रुपये या पातळीवर जाण्याची शक्यता आहे,’ असेही शहा यांनी नमूद केले.

फायद्याची गोष्ट २ | तुमची माहिती एकाच ठिकाणी देणारं हेल्थ कार्ड कसं काढायचं?

सोन्याचा भाव वाढण्याची कारणे
१) जागतिक शेअर बाजारांमधील मोठ्या प्रमाणातील चढउतार.

२) चालू वर्षात जगभर मंदी येण्याची शक्यता.

३) डॉलर इंडेक्समध्ये झालेली घसरण.

४) जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोन्याची खरेदी.

५) जगभरात वाढती महागाई.

आता सरकार बनवणार करोडपती; फक्त ५०० रुपये गुंतवा अन् कोटींचा परतावा मिळवा, जाणून घ्या कसे?
गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यापासून विशेषतः अमेरिकेतील बँकांच्या परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणूक पर्यायाकडे वळण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी पारंपारिक, सुरक्षित व सार्वभौम असलेल्या सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. याचा परिणाम म्हणजे जागतिक पातळीवर आठवड्यात सोने प्रति औंस (३१.१० ग्रॅम) ६.४८ टक्के वाढून १९८८.८५ डॉलरच्या पातळीवर पोचले. त्या आधीच्या आठवड्यात सोने १८६७ डॉलरवर होते. भारतात ‘एमसीएक्स’वर सोने प्रति दहा ग्रॅम ५९,४६१ रुपयांच्या उच्चांकावर गेले. या पूर्वीचा सोन्याचा उच्चांक ५९,४२० रुपये होता. आठवड्यात सोन्यात ५.८६ टक्के वाढ आहे. गेल्या आठड्यात सोने ५६,१३० रुपयांच्या पातळीवर होते. वर्षभराचा विचार केल्यास सोन्याने आठ टक्के म्हणजे सुमारे ४३६६ रुपयांचा प्रति दहा ग्रॅममागे परतावा दिला आहे. आगामी काळात सोने नवा उच्चांक गाठू शकते. – अमित मोडक, संचालक-सीईओ, पीएनजी सन्स

Gold Price Today: सोन्याच्या किंमतींची उंच भरारी! सोन्याला पुन्हा झळाळी, आतापर्यंतचा उच्चांकी भाव
चांदी ६८,०००वर
चांदीच्या किमतीनेही ६८,००० रुपयांची पातळी पार केली आहे. सराफा बाजारात सोमवारी चांदीचा भाव प्रति किलोसाठी ६८,२५० रुपयांवर पोहोचला. तत्पूर्वी, १७ मार्चला चांदीचा भाव प्रति किलोसाठी ६६,७७३ रुपयांवर गेला होता.

एक एप्रिलपासून ‘हॉलमार्किंग’ची सक्ती
नव्या नियमांनुसार, येत्या एक एप्रिलपासून सहा अंकी ‘हॉलमार्किंग’शिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही. ज्याप्रमाणे आधार कार्डवर १२ अंकी क्रमांक असतो, त्याचप्रमाणे सोन्यावर सहा अंकी ‘हॉलमार्क कोड’ असणार आहे. त्याला ‘हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक’ अर्थात ‘एचयूडी’ असे संबोधले जाते. हा क्रमांक उदाहरणार्थ ‘एझे४५२४’ असा असणार आहे. या क्रमांकाच्या मदतीने सोने नेमके किती कॅरेट आहे, हे समजणे सोपे जाणार आहे. देशात सोन्यावर ट्रेडमार्क अंकित करण्यासाठी ९४० केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here