पुणे: करोनामुळं लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. मात्र, या कठीण काळात न डगमगता अनेक जण मिळेल ते काम करून कुटुंबाचा आर्थिक भार उचलत आहेत. दुसरीकडे काहींनी गैरमार्गाचा अवलंब केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात खासगी कंपनीतील कौन्सिलरची नोकरी गेल्यानंतर महिलेनं चक्क चोरीचा मार्ग अवलंबला आणि तिला तुरुंगात जावं लागलं. एका ज्वेलर्समध्ये तिनं केली. या प्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिला अटक केली आहे.

स्नेहल वसंत पाटील असं या महिलेचं नाव आहे. एका खासगी कंपनीत ती कौन्सिलर या पदावर काम करत होती. लॉकडाऊनच्या काळात तिला नोकरी गमवावी लागली. ती बेरोजगार झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, तिनं पहिल्यांदाच चोरी केली नाही. याआधी २०१५ आणि २०१८ मध्येही तिनं चोरी केली होती. या घटनांमध्ये ती सामील असल्याचं उघड झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिच्यासोबतचे संबंध तोडले होते.

चंदन नगरमधील ज्वेलर्सचे मालक राहुल अरुण लोळगे यांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कोरेगाव पार्कमधील एका उच्चभ्रू सोसायटीतून तिला अटक करण्यात आली. ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत येथील इमारतीत राहत होती. तिचा बॉयफ्रेंड चित्रपट निर्माता असल्याचे सांगण्यात येते. या चोरीच्या घटनेबाबत त्याला काहीच माहिती नव्हते. कारण घटना घडली त्यावेळी तो मध्य प्रदेशात आपल्या कुटुंबीयांसोबत होता. २८ जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. पाटील ही या ज्वेलर्समध्ये आली होती. कानातले सोन्याचे दागिने दाखवण्यास तिने सांगितले. बराच वेळ ती दुकानात होती. ज्वेलर्समधील व्यक्तीचं लक्ष नसल्याची संधी साधून तिनं ६० हजार रुपये किंमतीचे दागिने घेऊन पळून गेली. दुकान बंद करताना तक्रारदारानं दुकानातील दागिने पाहिले असता, त्यातील कानातील दागिने गायब असल्याचे आढळून आले. त्यानंतर लोळगे यांनी चंदन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव हे तपास करत होते. संबंधित महिला दुकानात आली त्यावेळी तिचा चेहरा स्कार्फमध्ये पूर्णपणे झाकलेला होता. त्यामुळे ती सीसीटीव्हीत दिसत नव्हती. महिला ज्या रिक्षेतून दुकानात आली होती. ती रिक्षा पोलिसांनी शोधून काढली. रिक्षाचालकाने महिलेच्या केलेल्या वर्णनावरून पाटीलची ओळख पटली, अशी माहिती त्यांनी दिली. पाटील हिने चंदननगरमध्ये २०१५ साली तर बाणेरमध्ये २०१८ साली चोरी केल्याची माहिती उघड झाली आहे. तिनं अजून कुठे चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपी महिलेवर चोरीचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here