आशिया चषकासाठी भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी पाकिस्तान सज्ज असल्याचे पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला वाटत आहे. त्याने बीसीसीआयला राजकीय तणाव दूर ठेवून संघ पाकिस्तानात पाठवण्याचे आवाहन केले. लिजेंड्स लीग क्रिकेट दरम्यान, आफ्रिदीला मीडियाने विचारले होते की वाद असाच सुरू राहिला तर तोडगा कसा निघेल. यावर आफ्रिदी म्हणाला- आशिया कपसाठी कोण नाही म्हणत आहे? भारत नाही म्हणत आहे.
पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस
शाहिद आफ्रिदीचा मोठा गौप्यस्फोट
आफ्रिदी म्हणाला की, पाकिस्तान संघाला एकदा एका भारतीयाकडून धमकावले गेले होते, ज्याचे नाव तो घेऊ इच्छित नाही. पण तरीही पाकिस्तान सरकारने मतभेद बाजूला ठेवून संघ भारतात पाठवला. त्यामुळेच यावेळी भारत सरकारकडूनही तशीच अपेक्षा आहे.
आफ्रिदी म्हणाला, “तुम्ही भारतीय संघ पाठवा तरी आम्ही त्यांचा चांगला पाहुणचार करू. यापूर्वी मुंबईतील एका भारतीयाने पाकिस्तानला भारतात येऊ देणार नाही, अशी धमकी दिली होती. पण आम्ही सगळे बाजूला ठेवले आणि आमच्या सरकारने एक जबाबदारी म्हणून पाकिस्तानचा संघाला भारतात पाठवले. म्हणूनच धमक्यांमुळे आपल्यातील संबंध आमचे संबंध बिघडले नाही पाहिजेत, धोका तर असणारचं”
माजी अष्टपैलू खेळाडूने २००४-०५ मधील भारताच्या पाकिस्तान दौर्याची आठवण करून दिली आणि हरभजन सिंग, युवराज सिंग सारख्या खेळाडूंना पाकिस्तानच्या लोकांनी कसा आदर दिला, हे सांगितले.