मुब्बशिराचे वडिल चालक म्हणून काम करतात. तिला काहीही करुन दहावीच्या परीक्षा द्यायची होती. तिचा परीक्षेला बसण्याचा निर्धार पाहून दुसऱ्याच दिवशी बोर्डाकडून तिला लेखनिक मिळावा यासाठी परवानगी मागितली होती. बोर्डाने परवानगी दिल्यानंतर आम्ही लगेचच रुग्णवाहिकेची व्यवस्था केली, असं तिच्या मुख्याध्यापिका सबा कुरैशी यांनी म्हटलं आहे. तसंच, मुब्बाशिराला तिच्या वैद्यकिय उपचारांसाठी सर्व शिक्षकांनी मिळून मदत केली आहे.
नूरसबा अन्सारी या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी स्वतःच्या मर्जीने मुब्बाशिराची लेखनिक होण्याची तयारी दाखवली. तसंच, तिच्या वर्ग शिक्षिका डॉ. सनम शेख आणि इतर काही शिक्षकांनी मुब्बशिरांनी तिला सोमवारच्या विज्ञान २(जीवशास्त्र)च्या पेपरसाठी तयारी करण्यासाठी अतिरिक्त मेहनत घेतली. सकाळी १०.१५च्या सुमारास परीक्षा केंद्रावर रुग्णवाहिका बोलवण्यात आली. त्यात बसून तिने ११ ते १. १० यावेळेत पेपर दिला.
सेंट स्टॅनिस्लॉसचे मुख्याध्यापक, सिस्टर अॅरोकीअमल अँथनी यांनी रुग्णवाहिकेच्या आत दोन विद्यार्थ्यांचे पर्यवेक्षण करण्याची तयारी दाखवली. तर, पोलस आणि शिपाई रुग्णवाहिकेचा बाहेरच थांबले होते. रुग्णवाहिकेला आपण नकारात्मकतेशी जोडतो. पण इथे एक विद्यार्थिनी होती जिच्या हातात प्रश्नपत्रिका मिळाल्यावर आत्मविश्वास आणि सकारात्मक होती, हा एक नवीन अनुभव होता, असं सिस्ट अँथनी यांनी म्हटलं आहे.
मला परीक्षा द्यायला मिळाली याचा मला खूप आनंद आहे. स्वतःहून प्रश्नांची उत्तरे लिहणे आणि एखाद्याला उत्तरं लिहण्यास सांगणे हा एक वेगळा अनुभव होता. पण मला ही संधी सोडायची नव्हती, असं मुब्बशिराने म्हटलं आहे. ती २३ मार्चचा सामाजिक विज्ञान आणि २५ मार्चचा सामाजिक विज्ञान २ हे दोन्ही शेवटचे पेपरदेखील रुग्णवाहिकेतून देणार आहे.
‘हाफ’तिकीटाचे आदेश; स्वारगेट बस डेपोत एकमेकांना पेढे भरवत महिलांनी आनंद साजरा केला