दिल्ली: बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थी वर्षभर मेहनत घेतात. मुलांकडून पालकांच्या बऱ्याच अपेक्षा असतात. या अपेक्षा पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्यांवर दबाव येतो. याचमुळे मुलं आई-वडिलांशी खोटं बोलू लागतात. दिल्लीत अशीच एक घटना घडली आहे. दहावीचा पेपर कठिण गेल्यानं एका मुलीनं स्वत:च्या अपहरणाची आणि छेडछाडीची कहाणी रचली. तिनं ही कहाणी कुटुंबीयांसोबत पोलिसांना सांगितली. विद्यार्थिनीनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी तिचं पितळ उघडं पाडलं.

दिल्लीच्या भजनपुरा परिसरात ही घटना घडली. १५ मार्चला विद्यार्थिनी शाळेत पेपर देण्यासाठी गेली होती. शाळेतून परतताना आपलं अपहरण झाल्याचं, काही जणांनी आपली छेड काढल्याचं तिनं घरी येऊन सांगितलं. ‘शाळेतून घरी परतत असताना २-३ अज्ञात तरुणांनी रस्ता अडवला. मला निर्जनस्थळी नेलं. तिकडे माझी छेड काढली, शोषण केलं,’ असं विद्यार्थिनीनं आई, वडिलांना सांगितलं.
लग्नाच्या १० दिवसांनंतर नवरा-नवरीचं अपहरण; दिवसाढवळ्या घरातून पळवलं; कारण समोर
घाबरलेल्या पालकांनी मुलीला घेऊन पोलीस ठाणं गाठलं. तिकडे मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दिल्ली महिला आयोगाच्या सदस्यांच्या मदतीनं तिचं समुपदेशन करण्यात आलं. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि तपास सुरू केला. पोलिसांनी मुलीकडे घटनास्थळाबद्दल विचारणा केली. विद्यार्थिनीनं घटनास्थळ सांगितलं. त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले होते.
VIDEO: बस आज की रात है जिंदगी! गाण्यावर तुफान नाच; सरकारी अधिकारी कोसळला, तो उठलाच नाही
पोलिसांनी सीसीटीव्हीत कैद झालेले फुटेज तपासण्यास सुरुवात केली. मात्र त्यांना त्यामध्ये काहीच सापडलं नाही. विद्यार्थिनीनं सांगितलेल्या प्रकारची घटना सीसीटीव्हीत नव्हतीच. यानंतर पोलिसांनी दुसऱ्यांदा विद्यार्थिनीचं समुपदेशन केलं. यावेळीही दिल्ली महिला आयोगाचे सदस्य उपस्थित होते. ‘माझी दहावीची परीक्षा सुरू होती. समाजशास्त्राचा पेपर कठिण गेला. कमी गुण मिळाल्यास आई, वडील ओरडतील याची भीती वाटत होती. त्यामुळे अपहरण आणि शोषणाची कहाणी रचली,’ असं विद्यार्थिनीनं पोलिसांना सांगितलं.

सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here