जळगावः आईला दुकानावर पाठवले. आई दुकानावर गेल्यानंतर घरात एकटा असलेल्या मुलाने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळल्याची घटना जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथे घडली. निसर्गाच्या लहरीपणामुळे हवे तसे उत्पन्न आले नाही. त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला आणि याच कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दीपक संतोष पाटील (३५, रा.कुसूंबा) असे मयत शेतकऱ्‍याचे नाव आहे.

अमळनेर तालुक्यातील झाडी गावाचे मूळचे रहिवासी दीपक पाटील हे शेतीवर उदरनिर्वाह करत होते. गावात शेती करत होते. या शेतीसाठी सोसायटीतून कर्ज घेतले होते. मात्र अस्मानी संकटांमुळे शेतीत अपेक्षित उत्पन्न न आल्याने कर्जाची परतफेड करता आली नाही. दीपक पाटील यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. त्यामुळे काही वर्षांपासून झाडी गाव सोडून दीपक पाटील हे परिवारासह जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे राहायला आले होते. कर्जाची परतफेड व्हावी म्हणून दीपक पाटील शेती कामासोबत एमआयडीसीत एका कंपनीत हातमजुरीचे काम करत होते.

घरच्यांना वाटले भजनाला गेले, म्हणून रात्री निवांत झोपले, सकाळीच शेतकऱ्याबाबत आली वाईट बातमी
आईला दुकानावर पाठवून मृत्युला कवटाळले

दीपक याची पत्नी मुलांसह माहेरी गेली आहे. त्यामुळे घरी दीपक व त्यांच्या आई हे दोघेच होते. रविवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दिपकने आईला दुकानातून काही तरी वस्तू घेण्यास पाठविले. आई दुकानावर गेली तेवढ्यात त्यांनी पॅन्टच्या सहाय्याने घरात गळफास घेवून आत्महत्या केली. रात्री ८ वाजेच्या सुमारास आई दुकानावरून घरी परतल्यावर त्यांना मुलगा दीपक हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी हंबरडा फोडला. दीपक पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पायावरुन कार गेली, शस्त्रक्रिया केली, वेदनेने तडफडणाऱ्या मुलीने रुग्णवाहिकेतून दिला १०वीचा पेपर

लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here