नवी दिल्ली : मागील महिन्यात किमती पडल्यानंतर गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. सोमवारपासून सोने-चांदीच्या किंमतीत वाढ झाली असून सण-उत्सवापूर्वी खरेदीदारांना चांगलाच घाम फुटला आहे. सण, उत्सव आणि समारंभ प्रसंगी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्याची परंपरा आहे. याशिवाय उद्या हिंदू नववर्ष (गुढीपाडवा) संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जाणार असल्यामुळे जर तुम्ही देखील सोने खरेदीचा विचार करत असाल तर आधी नवीन दर तपासून घ्या.

सोन्याचा आजचा भाव काय?
जगभरातील घडामोडींमुळे सोन्याच्या दरात तेजीने व्यवहार होत आहे. परिणामी सोमवारी सोन्याचा भाव ६० हजार रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले, तर व्यापाऱ्यांच्या शेवटी सोन्याच्या भावात घसरण झाली. मात्र मंगळवारी कमोडिटी बाजारात पुन्हा एकदा तेजीने व्यवसाय होताना दिसत आहे. आज देशांतर्गत वायदे बाजारात सोने पुन्हा एकदा चमकत असून MCX वर सोने १७० रुपयांनी आणखी वाढले असून सध्या मौल्यवान सोन्याची किंमत ५९,६७६ रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेड करत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुलासह अनेक घटकांवर देशभरात सोन्या-चांदीच्या किमती अवलंबून असतात.

Gold Rate Today: करोनापश्चात प्रथमच असं घडलं; सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर, भाव का वाढतायेत
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याला झळाळी

कमोडिटी एक्स्चेंजमध्ये सोन्या-चांदीच्या दरात जोरदार व्यवहार होत आहे. सोने प्रति औंस $१९८७ तर चांदी $२२.६८ प्रति औंस वर व्यवहार करत आहे. मात्र, सोन्याचे भाव कालच्या एक वर्षाच्या उच्चांकापेक्षा खाली पडले आहेत. सोन्याच्या मजबूत वाढीचे मुख्य कारण म्हणजे जागतिक बँकिंग व्यवस्थेची खराब स्थिती आहे ज्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे.

बाप्पासाठी 228 तोळे सोन्याचा खास पाळणा, गणेश जन्म सोहळ्यासाठी दगडुशेठ मंदिराची आकर्षक साजवट

अदानी समूहाचे शॉर्ट सर्किट! हिंडेनबर्गचे धक्के सुरूच, कर्जाचं भार हलकं करताना हातून निसटले प्रकल्प
सोन्याच्या किमतींवर तज्ञांचे मत काय?
सोन्याच्या भावाने सर्वकालीन विक्रमी पातळी गाठल्यावर आता सोन्याचा भाव यंदा ६४,००० रुपयांच्या पुढे जाऊ शकतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. अलीकडेच सोन्याच्या दरांनी ५९ हजार प्रति तोळा पातळी ओलांडली होती, तर आता त्यात काही सुधारणा दिसून येत आहे, मात्र सोन्याचा भाव पुन्हा ६०,००० रुपयांच्या जवळ व्यवहार करत आहे. बाजारातील एक्स्पर्टसनुसार सोन्याचा भाव यंदा वाढत राहू शकतो आणि किंमत ६४ हजार रूपांवर मुसंडी मारू शकते.

(सोन्याचे हे दर प्रति १० ग्रॅम आहेत आणि त्यात GST आणि मेकिंग चार्जेस जोडलेले नाहीत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here