बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये सिझेरियन अर्थात शस्त्रक्रियेद्वारे मुलांना जन्म देण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र नैसर्गिक प्रसूतीऐवजी सिझेरीयनद्वारे केलेल्या प्रसूतीमुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. एक किंवा दोन वेळा सीझेरियन झालं असेल, तर त्या महिलेची सामन्य प्रसूती होणं अशक्यच असतं. शिवाय दोन किंवा तीन वेळा सिझेरियन झालं असेल तर त्या महिलेच्या जीवालाही धोका असतो. हाच धोका टाळता यावा यासाठी नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी रिसर्च करून तीन वेळा सिझेरियन झालेल्या एका महिलेची सामान्य प्रसूती करण्याची किमया साध्य केली आहे.
अपघाती रुग्णांनाही उपचार मिळेना; सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे रुग्णांचे हाल
शासकीय रुग्णालयात सामान्य प्रसूतीसाठी होणार संशोधन
एक वेळा सिझेरियन झालं असेल तर त्या महिलेची सामान्य प्रसूती होण्याची शक्यता ५७ टक्के इतकी असते. दोन वेळा सिझेरीयन झालं असेल तर तिसऱ्या वेळी सामान्य प्रसूती करण्याचा प्रयत्न केला जात नाही. तीन वेळा सिझेरियन झाल्यावर तर सामान्य प्रसूतीचा प्रश्नच उद्भवत नाही. पण नांदेडच्या डॉक्टरांनी हे शक्य करून दाखवलं. सिझेरीयन कसं टाळलं जाऊ शकतं यावर आता डॉक्टर संशोधन करत आहेत.
महिलेच्या पोटावर शस्त्रक्रिया करुन बाळाला जन्म देणं ही प्रक्रिया त्या महिलेसाठी अत्यंत त्रासदायक असते. पुढील अनेक महिने त्या महिलेला त्रास सहन करत विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे सामान्य प्रसूतीसाठी अधिक संशोधन होणं गरजेचं आहे.