या प्रकरणी व्हिजन सिटी जांभूळ येथील १८ वर्षीय संशयित आरोपी व दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक अल्पवयीन आरोपी जांभूळ तर दुसरा वडगाव माळीनगर येथील रहिवासी आहे.
पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ मयेकर याची आरोपींसोबत जांभूळ रोडवर भांडणे झाली होती. यात सक्षम आनंदे याच्या पाठीवर कटरने वार करण्यात आला होता. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी मयेकर याची गाडी अडवून त्याचे अपहरण केले. ब्राह्मणवाडी साते गावच्या हद्दीत असलेल्या खापरे ओढ्याजवळ नेऊन त्याला मारहाण केली तसेच डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.
पोलिसांनी वेळीच दखल घ्यायला हवी होती; लेकीच्या न्यायासाठी आई-बापाची आरोपींना फाशी देण्याची मागणी
दोन तासांत पोलिसांनी तपासाची सूत्रं फिरवली
खुनाची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी तातडीने दोन पथके तयार केली. मोबाईल लोकेशनच्या आधारे दोन तासांमध्येच तिन्ही आरोपींना पिंपरी- चिंचवड येथून अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक सुनील जावळे, सुनील मगर, अमोल कसबेकर, आशिष काळे, श्रीशैल कंटोळी, अमोल तावरे, सागर गाडेकर, गणेश होळकर, चेतन कुंभार, महिला पोलिस निर्मला उप्पू, केतकी सपकाळ, अर्चना मोरे, होमगार्ड सुरेश शिंदे या पथकाने ही मोठी कामगिरी केली आहे.
Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News