बोर्डाच्या परीक्षेत शिक्षकाने नियमानुसारच कामकाज केल्याचा राग मनात धरुन पेपर सुटल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी शिक्षकावर दगडफेक केली. या घटनेत संबंधित जखमी झाला असून ही घटना मनमाड मध्ये घडली आहे. याप्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आली असून निलेश दिनकर जाधव असे या जखमी शिक्षकाचे नाव आहे. निलेश दिनकर जाधव (वय ३५) छत्रे विद्यालयातील कलाशिक्षक आहेत. सध्या दहावी बोर्डाचे पेपर सुरू असल्याने निलेश जाधव यांना बोर्डाच्या परीक्षेत सुपरव्हिजनचे काम सोपविण्यात आले होते. पेपर सुरू असताना त्यांनी बोर्डाने घालून दिलेल्या नियमानुसारर काम सुरू ठेवले. नियमांचे उल्लंघन होईल, असे काम त्यांनी वर्गात होऊ दिले नाही.
लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त
विद्यार्थ्यांना याच गोष्टीचा राग आला. पेपर संपल्यानंतर ते आपले सर्व काम आटोपून शाळेच्या बाहेर पडले असता विद्यार्थ्यांच्या गर्दीतून त्यांच्या दिशेने काही विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. यात निलेश जाधव जखमी झाले. त्यांच्या डोक्याला दगड लागल्याने ते रक्तबंबाळ झाले. अशाच अवस्थेत त्यांनी मनमाड पोलीस ठाणे गाठत सर्व घडलेली घटना सांगितली. त्यानंतर त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले.
सदर हल्ला कोणत्या कारणामुळे झाला ते मात्र अद्यापही कळू शकले नाही. सध्या दहावीच्या बोर्डाचे पेपर सुरू असल्याने शाळेच्या गेटजवळ एका शिक्षकावर असा झाल्याने ही घटना संशय निर्माण करणारी असून त्यामुळे शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.