पुणे : ओपन जिममध्ये व्यायाम केल्यानंतर फोनवर बोलत असताना तरुणावर काळाने घाला घातला. अमोल शंकर नाकते (वय २१ वर्ष) या युवकाचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात कोथरुड भागातील उजव्या भुसारी कॉलनीत सोमवारी (ता. २० मार्च) रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

२१ वर्षीय अमोल शंकर नाकते हा इव्हेंट मॅनेजमेंटची काम करत होता. तो रोज संयुक्त भुसारी कॉलनीतील मित्र मंडळाच्या मैदानात आपल्या मित्रांसोबत व्यायाम करण्यासाठी येत असे. काल रात्री देखील तो नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी गेला होता. यावेळी फोनवर बोलत असताना तो अचानक खाली पडला.

बाबा फोन उचलत नाहीयेत रे, मुंबईहून मुलाचा मित्राला फोन, घरी जाऊन पाहिलं तर आक्रित घडलेलं
अमोल खाली पडल्याचं पाहून त्याच्या मित्रांनी त्याच्याकडे धाव घेतली आणि जवळच्या दवाखान्यामध्ये त्याला भरती केलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर पायातून विजेचा प्रवाह वाहिल्याने पायाची बोटं काळी निळी झाल्याचं दिसलं. त्यामुळेच त्याचा मृत्यू देखील झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र, अद्याप ससून रुग्णालयातील शवविच्छेदन अहवाल आला नसल्याने अमोलचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अधिकृत रित्या स्पष्ट झालेलं नाही.

लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त

याबाबत अमोलचा भाऊ म्हणाला की महापालिकेच्या वतीने जिथे ओपन जिम बांधण्यात आली आहे, तिथं महावितरणची वायर देखील गेली आहे. काल या वायरने माझ्या भावाचा जीव घेतला आहे. पोलीस कोणावरही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत. ज्या वायरीने शॉक लागला आहे, त्याच वायरने त्याचा मृत्यू झाला आहे, हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे याबाबत पोलिसांनी अनोळखी व्यक्ती किंवा पालिका किंवा महावितरण यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी असल्याचं अमोल नकातेचा भाऊ म्हणाला.

कुटुंब देवदर्शनाला, तरुणाने मित्रासह आयुष्य संपवलं; घरातली आग विझवल्यावर गूढ उलगडलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here