कोल्हापूर: उद्या गुढीपाडवा आहे आणि याच मुहूर्तावर बाजारात फळांचा राजा आंबा दाखल झाला आहे. मात्र आंब्याचे भाव हे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले असून प्रति डझन हजार ते दीड हजार भाव आंब्याला मिळाला आहे. यामुळे सामान्य नागरिकाच्या खिशाला कात्री बसत आहे. यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र वातावरणातील बदलामुळे आणि अवकाळी पावसामुळे आंब्याचा मोहोर गळून पडल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. यंदा आंबा उशिरा येणार असून गतवर्षीपेक्षा ३० ते ४० टक्के उत्पादन घटणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

गुढीपाडव्याला नवीन वर्षाचे स्वागत करत फळांचा राजा आंबा खरेदीला अनेक जण पसंती देत असतात. मात्र यंदाचा आंबा हा सामान्य नागरिकांच्या खिशाला न परवडणारा झाला आहे. कोल्हापूरच्या बाजारात आंब्याला प्रति डझन हजार ते दीड हजार भाव मिळत असून आंबा खरेदी करायचा का नाही यास विचारात सामान्य नागरिक आहे.

तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात होणार मोठा बदल; चेपॉकसाठी रोहित शर्माचा गेम प्लॉन तयार
अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे आंबा पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. साधारण डिसेंबर ते जानेवारी दरम्यान आंबा पिकाला चांगला मोहर येतो. मात्र वातावरणामध्ये अचानक झालेल्या बदलांमुळे आणि फळ लागण्याच्या काळात मोहर गळून पडल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे तसेच शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून याचा प्रभाव बाजारात दिसून येत आहे.

Nitin Gadkari: नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी; १० कोटी रुपयांची खंडणी अन्यथा…
उद्या गुढीपाडवा असल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले असून गुढीपाडव्यानिमित्त आंबा मार्केटला नागरिकांनी आंबा खरेदीसाठी गर्दी केली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोगाची लागण झाल्याने आंबा उत्पादनात घट झाली आहे. यामुळे गतवर्षापेक्षा तीस ते चाळीस टक्के उत्पन्नामध्ये घट झाली असून दरामध्ये मोठे वाढ झाली आहे.

पुणेकरांचा नादच खुळा! आंब्याच्या एका पेटीला ४१ हजाराची बोली, एक आंबा ६२१ रूपयांना

सध्या बाजारात एक डझनाला आंबा अंदाजे १ हजार ते १५०० रुपयांपर्यंत मिळत असून आणखी काही दिवस हाच दर राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील दोन दिवसांपासून हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणत आवक झाली आहे, तर पेटीचा दर सरासरी तीन हजार रुपये तर बॉक्सचा दर सरासरी सहाशे रुपये आहे. तसेच ऑरगॅनिक आंबा हा प्रती डझन १००० ते १३०० आहे. यामुळे आंबा सामान्यांच्या आवाक्या बाहेर झाला असून फळांचा राजा आंबा हा नागरिकांच्या खिशाला न परवडणारा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here