वैजापूर परिसरातील रहिवाशी भाग असलेल्या खान गल्लीत एका इमारतीच्या काही खोल्यांमध्ये छुप्या पद्धतीनं महिलांकडून देहविक्री व्यावसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी अगोदर त्या इमारतीची संपूर्ण माहिती घेतली. साध्या वेशातील काही पोलिसांनी परिसरावर नजर ठेवली. या इमारतीमध्ये महिलांचं शिवाय मद्यधुंद पुरुषांचं सारखं येणं जाणं असल्याचं आढळून आलं.
रहिवासी भाग असल्याने पोलिसांनी थेट कारवाई करणं टाळलं. त्या कुंटनखाण्यात डमी ग्राहक म्हणून एका पंटर पाठवलं. त्याने आत जाऊन सांगितल्यानुसार सर्व माहिती घेतली. यानंतर पोलिसांना इमारतीत देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाली. यानंतर दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने इमारतीत छापा टाकला. या छाप्यात विविध खोल्यांमध्ये तपास केला. तिथे पाच महिला आणि काही ग्राहकांना पोलिसांनी पकडलं.
पोलिसांनी महिलांची अधिक विचारपूस केली. ‘हा देहविक्रीचा व्यवसाय अनेक दिवसापासून सुरू होता. तीन महिला दलाल आम्हाला हा व्यवसाय करायला लावत होत्या. ग्राहकांकडून मिळालेल्या पैशातून अर्धे पैशे त्या महिला घेत होत्या’, अशी माहिती देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांनी पोलिसांना दिली. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात स्त्री व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम ( पिटा ॲक्ट ) १९५६ या कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय लोहकरे करत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील हिंदू जन गर्जना मोर्चाचं भव्य स्वरूप; ड्रोननं टिपले शेकडो शिवप्रेमी