परभणी : महाराष्ट्रात सध्या अवकाळी पाऊस सुरु आहे. ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे. वीजेच्या तारा देखील तुटून पडत आहेत. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी रस्त्यावर धावत्या दुचाकीवर अचानक विजेची तार तुटून पडल्यानं पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी एका जखमी झालेल्या व्यक्तीवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरु होते. या घटनेमध्ये जखमी झालेल्या राहुल चव्हाण यांचा छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना जिथं घडली तिथं माणुसकीचं अनोखं दर्शन घडून आलं, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी दुचाकी चालकाची मदत केली, यानिमित्तानं हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन झाले आहे.

जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव काजळे येथील राहुल चव्हाण, वंदना चव्हाण,सिध्दार्थ चव्हाण हे दुचाकीवरुन काकडे मानकेश्वर येथे सात्वंनपर भेटीसाठी गेले होते. भेट घेऊन गावाकडे परत येत असताना येलदरी रस्त्यावरील एका पेट्रोलपंपासमोर अचानक विजेची तार तुटून त्यांच्या अंगावर पडली.

विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमधील राग बाहेर काढला, शाळेच्या गेटजवळ दगडफेक, शिक्षकाचं डोकं फुटलं

राहुल चव्हाण यांच्या पोटाला तार चिटकल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथून पुढे परभणी आणि तेथून छत्रपती संभाजी नगर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. जखमी राहुल चव्हाण यांचा एक हात निकामी झाला. प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. याच घटनेत जखमी असलेल्या मयताच्या पत्नी वंदना चव्हाण यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हिंदूविरोधी ट्वीटमुळे लोकप्रिय अभिनेत्याला अटक, म्हणाला- ‘हिंदुत्व खोट्या आधारावर…’

लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त

राहुल चव्हाणचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला

छत्रपती संभाजी नगर येथे उपचारा दरम्यान राहुल चव्हाण यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत जिंतूर पोलिस ठाणे गाठले. गुन्हा दाखल करत आर्थिक मदत देण्याची मागणी केली. यावेळी सपोनि. विकास कोकाटे यांनी नातेवाईकांची समजूत घालून मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन जाण्यास सांगितले. नातेवाईकांचे समाधान झाल्याने मृतदेह गावाकडे नेण्यात आला. गावी राहुल चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल चव्हाण यांचं या घटेनत निधन झाल्यामुळं पिंपळगाव काजळे गावावर शोककळा पसरली.

३५०० हजार किलो कांदा विकला, शेतकऱ्याच्या हातात रुपया नाही, उलट व्यापाऱ्याने १८०० मागितले, अख्खं कुटुंब रात्रभर रडलं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here