नवी दिल्ली: संजय राऊत महागद्दार आहे. ते राज्यसभेवर आमच्या मतांवर निवडून गेले आहेत, अशी बोचरी टीका करणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांना संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मी राज्यसभेवर काय पहिल्यांदा निवडून गेलेलो नाही. मी चौथ्यांदा राज्यसभेवर निवडून गेलो आहे. मी तुमच्या मतांवर निवडून आलो नाही, ती मतं शिवसेनेची होती, असे संजय राऊत यांनी शिंदे गटाला ठणकावून सांगितले. ते मंगळवारी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शिंदे गटाच्या आमदारांनी आज विधानसभेत संजय राऊत यांच्यावर आगपाखड केली होती. दादा भुसे यांनी संजय राऊत यांची ‘महागद्दार’, ‘भाकरी खायची मातोश्रीची आणि चाकरी करायची राष्ट्रवादी आणि पवारांची’, अशा शब्दांत हेटाळणी केली होती. तर शंभुराज देसाई यांनीही संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. हे संजय राऊत आमच्या मतांवर निवडून आले आहेत आणि आम्हालाच बोलतात. आम्ही सभागृहाचे सदस्य आहोत. राऊत आम्हाला ‘डुक्कर’, ‘गटाराचं पाणी’, असे बोलतात. राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन परत निवडून येऊन दाखवावं, असे खुले आव्हान शंभुराज देसाई यांनी दिले होते.
संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटाचे आमदार सभागृहात चवताळले, शरद पवारांच्या उल्लेखाने राष्ट्रवादी आक्रमक
या सगळ्या टीकेला संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत प्रत्युत्तर दिले. दादा भुसे यांच्याकडे मी गिरणा सहकारी कारखान्यातील गोष्टींविषयी खुलासा मागितला होता. मी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला नव्हता. मग दादा भुसेंच्या दाढीला इतकी आग लागण्याचा कारण काय? गिरणा सहकारी कारखान्यातील शेतकरी खुलासा मागत आहेत. गिरणा अॅग्रो कंपनीच्या नावाखाली दादा भुसे यांनी यांनी शेतकऱ्यांकडून १७५ कोटी गोळा केले आणि संकेतस्थळावर ४७ शेतकऱ्यांच्या नावे फक्त दीड कोटी दाखवले. त्यामुळे १ १ फेब्रुवारीपासून या प्रश्नावर त्या भागातील शेतकरी आंदोलन करत आहेत, हिशेब मागत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

मला खासदारकी तुम्ही दिलेय का, मी चौथ्या टर्मचा खासदार, तुमच्या मतांवर निवडून आलेलो नाही: राऊत

संजय राऊत आमच्या मतांवर राज्यसभेवर निवडून गेले, या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिले. मला खासदारकी तुम्ही दिलेय का? महाराष्ट्र विधानसभेतील जे सर्व आमदार आहेत त्यांनी मला खासदारकी दिली आहे. तुम्हाला कोणी मतं दिली, तुमची मतं आकाशातून पडली का? बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने तुम्हाला आमदार आणि मंत्री केलं ना. आता निवडून येऊन दाखवा, आमची मतं म्हणता ना, तुमची मतं कुठली, ही शिवसेनेची मतं होती. आता तुमच्याकडे मतं असतील तर पुन्हा निवडून येऊन दाखवा, असे आव्हान संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दिले.

शेतकऱ्यांना फसवलं, शिंदेंच्या मंत्र्याचा कोट्यवधींचा घोटाळा, संजय राऊतांनी फोडला ‘बॉम्ब’

तुम्ही मोदींना बाप म्हणवून घेता, त्याचं काय; राऊतांचा सवाल

संजय राऊत शिवसेनेत असूनही शरद पवारांच्या जवळ आहात, असे शिंदे गटाच्या आमदारांनी म्हटले. त्यावर राऊतांनी नेहमीच्या शैलीत कोंडी करणारा प्रश्न विचारुन शिंदे गटाच्या आमदारांना क्लीन बोल्ड केले. मला शरद पवारांचे चाकर म्हणता. पण तुम्ही उद्धव ठाकरेंचे असताना ‘मोदी आमचा बाप आहे’, असं म्हणता, ते चालतं का, याचं उत्तर आधी द्या, असे संजय राऊतांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here