राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत भिडे बोलत होते. ‘मंदिर बांधून करोनाचा संसर्ग कमी होईल असे काही लोकांना वाटते, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केले होते. तसेच, मुख्यमंत्री यांनी देखील आयोध्येतील भूमिपूजन सोहळा ऑनलाइन होण्याबाबत विचार करावा, असे वक्तव्य केले होते. त्यावर भिडे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन्हीही नेते वंदनीय आहेत. पण त्यांचे विधान हे गोंधळल्यासारखे आहे. युद्ध भूमीत मरगळलेल्या अर्जुनासारखी त्यांची अवस्था झाली आहे. पवारांच्या सारखी ज्ञानसंपन्न असलेली व्यक्ती असे बोलत असेल तर त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत उपस्थित करता येईल. एसटी बंद करून, व्यवसाय बंद करून करोना जाणार आहे का,’ असा सवालही त्यांनी केला. ‘पवार बोलले ते मला वाईट वाटले. त्यांना निमंत्रण नसले तरी त्यांनी आयोध्येत जावे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे आहे. तेच महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील,’ असंही भिडे म्हणाले.
‘बाबरी पतन ऑनलाइन झाले नव्हते’
उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन भूमिपूजनाचा आग्रह धरू नये. बाबरी मशिदीचे पतन करण्यासाठी शिवसैनिक ऑनलाइन गेले नव्हते हे त्यांनी लक्षात ठेवावे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे काम नि:संशय चांगलेच आहे. मात्र, त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात जाऊन करोनाचा आढावा घेतला पाहिजे. त्यांनी करोनावर मात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
‘या’ बाबतीत शिवसेनेची पाठराखण
बाबरी मशिद पाडण्याचे श्रेय शिवसेनेने घेऊ नये, असे वक्तव्य भाजपच्या नेत्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भिडे म्हणाले, ‘भाजपच्या नेत्यांनी असे बोलणे योग्य नाही. शिवसैनिकांनी जाहीरपणे बाबरी मशिद पाडण्यात सहभाग घेतला होता. देशाच्या राजकारणातही शिवसेना महत्त्वाची आहे. हिंदुत्व टिकवणे आणि वाढवण्यासाठी शिवसेना अत्यंत महत्त्वाची आहे.’
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
I like the valuable information you provide in your articles.
I really like and appreciate your blog post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.