देहरादून: उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात रस्ते अपघातात ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. रविवारी झालेल्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. रस्ता ओलांडत असताना मुलाला भरधाव वेगातील बाईकनं धडक दिली. त्यानंतर मुलगा हवेत उडाला आणि अनेक फूट दूर जाऊन पडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पीडित कुटुंबानं बाईकस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

रविवारी दुपारी जिल्ह्यातील अगत्स्यमुनी नगर क्षेत्रातील बनियाडी वॉर्डात असलेल्या देवनगरमध्ये ९ वर्षीय मुलगा रस्ता ओलांडत होता. रस्ता ओलांडत असताना त्याला भरधाव दुचाकीनं उडवलं. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी सदानंद पोखरियाल यांनी दिली. रायडी परिसरात वास्तव्यास असलेले देवराज पत्नी आणि आई वडिलांसह बनियाडीमध्ये सत्संग सभेत सहभागी होण्यासाठी आले होते. देवराज यांचा ९ वर्षीय मुलगा दक्षदेखील त्यांच्यासोबत होता.
पिकनिक, प्री वेडिंग फोटोशूट, बर्थडे साजरा करायला स्मशानात होतेय गर्दी; कारण काय?
सत्संग सभा संपल्यानंतर दक्ष त्याच्या आजी आजोबांसोबत जात होता. त्यावेळी त्यानं रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानातून खाद्यपदार्थ घेण्याचा हट्ट धरला. आजी आजोबा दुकानाच्या दिशेनं पावलं टाकू लागलं. त्याचवेळी दक्ष दुकानाच्या दिशेनं धावला. त्याचवेळी त्याला अपाचे बाईकनं धडक दिली. अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यात बाईकचा वेग अतिशय जास्त असल्याचं दिसत आहे. बाईकची धडक बसल्यानंतर दक्ष हवेत उडाला आणि काही फूट अंतरावर जाऊन पडला. अपघातात तो गंभीर जखमी झाला.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

कुटुंबीय आणि आसपासच्या लोकांनी दक्षला अगत्स्यमुनी रुग्णालयात दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर दक्षच्या कुटुंबीयांनी बाईकस्वाराविरोधात अगस्त्यमुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सध्या पोलीस बाईकस्वाराचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here