जखमी पाच जणांवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार
गणेश नामदेव खैरनार (वय ३२), पंकज रवींद्र खैरनार (वय ३०), जीवन सुदीप ढाकणे (वय २५), तुषार बिडकर (वय २२), दीपक बिडकर (वय २४, रा. चास, ता. सिन्नर जि. नाशिक अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत. यातील जखमी आणि मृत झालेले तरुण मंगळवारी सकाळी तुळजापूरला (एमएच १५ ई एक्स ३२११) या बोलेरो वाहनातून सोलापूर ते तुळजापूरकडे देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. सोलापूर उस्मानाबादच्या सीमेवर वाहन पलटी होऊन हा अपघात झाला आहे.
लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त
टायर फुटल्याने बोलरे वाहन पलटी
मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास भाविकांची बोलेरो गाडी सोलापूरहून तुळजापूरच्या दिशेने निघाली होती. सोलापूर उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या कटारे स्विमिंगजवळ अतिशय वेगात असलेल्या वाहनाचे टायर फुटले. त्यामध्ये बोलेरो वाहन तीन ते चार वेळा पलटी झाली आणि यात तिघांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर या सर्वांना तात्काळ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. येथे तपासणी केली असता तिघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर पाच जणांवर उपचार सुरू केले.अपघातातील जखमींपैकी तिघांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.