सांगली: अभिनेता याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून वाद रंगलेला असतानाच आता त्यात शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक यांनी उडी घेतली आहे. सुशांतसिंहबद्दल बोलणं म्हणजे आयुष्य घालवण्यासारखच आहे. त्यामुळे या विषयावर बोलायलाच नको, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संभाजी भिडे यांनी ही टीका केली. आज आपल्या समजावर दुर्देवाने नट आणि नट्यांचा प्रभाव आहे. आपला समाज या नटनट्यांचा आदर्श घेतो. या नटनट्यांची लायकी काय आहे? त्यांची पात्रता काय? उंची किती तरीही १ अब्ज ३५ कोटी जनता त्यांना आदर्श आणि मार्गदर्शक म्हणून स्वीकारतात. याचा अर्थ या देशाचं लवकरच वाटोळं होणार हे निश्चित आहे. त्याचंच हे निदर्शक आहे. सुशांतसिंह नावाच्या नटाबद्दल बोलणं म्हणजे आयुष्य घालवण्यासारखं आहे. त्याच्याबद्दल बोलणं सुद्धा चूक आहे. त्यावर बोलायलाच नको, असं संभाजी भिडे म्हणाले.

यावेळी भिडे यांनी अयोध्येतील भूमिपूजनासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्याबद्दलही प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन भूमिपूजनाचा आग्रह धरू नये. बाबरी मशिदीचे पतन करण्यासाठी शिवसैनिक ऑनलाइन गेले नव्हते हे त्यांनी लक्षात ठेवावे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे काम नि:संशय चांगलेच आहे. मात्र, त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात जाऊन करोनाचा आढावा घेतला पाहिजे. त्यांनी करोनावर मात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं सांगतानाच शिवसैनिकांनी जाहीरपणे बाबरी मशिद पाडण्यात सहभाग घेतला होता. देशाच्या राजकारणातही शिवसेना महत्त्वाची आहे. हिंदुत्व टिकवणे आणि वाढवण्यासाठी शिवसेना अत्यंत महत्त्वाची आहे, असं ते म्हणाले.

‘शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन्हीही नेते वंदनीय आहेत. पण त्यांचे विधान हे गोंधळल्यासारखे आहे. युद्ध भूमीत मरगळलेल्या अर्जुनासारखी त्यांची अवस्था झाली आहे. पवारांच्या सारखी ज्ञानसंपन्न असलेली व्यक्ती असे बोलत असेल तर त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत उपस्थित करता येईल. एसटी बंद करून, व्यवसाय बंद करून करोना जाणार आहे का,’ असा सवालही त्यांनी केला. ‘पवार बोलले ते मला वाईट वाटले. त्यांना निमंत्रण नसले तरी त्यांनी आयोध्येत जावे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे आहे. तेच महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील,’ असंही ते म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here