लखनौ : उत्तर प्रदेशातील आरोग्य व्यवस्थेचे वाजलेले तीन-तेरा एका लहान मुलाच्या निरागस प्रश्नातून अधोरेखित झाले आहेत. लखीमपूरमधील रुग्णालयात दाखल असलेल्या पित्याला पाहायला बारा तास एकही डॉक्टर आला नाही. बारा तासांनी आलेल्या डॉक्टरने रुग्णाला लखनौला नेण्याचा सल्ला दिला. मात्र त्यानंतर अवघ्या दहा मिनिटात रुग्णाने प्राण सोडले. त्यामुळे ‘अशी कोणती ट्रेन आहे, जी १० मिनिटांत लखनौला नेईल?’ असा चिमुरड्याने रडत रडत केलेला सवाल सर्वांच्या काळजाला घरं पाडत आहे.

आदर्श पांडे नावाच्या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साश्रू नयनांनी आदर्शने विचारलेला सवाल उत्तर प्रदेशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, तसंच प्रत्येकाचं हृदय पिळवटून काढत आहे. १६ मार्चच्या रात्री दोन वाजताच्या सुमारास आदर्शचे वडील रामचंद्र पांडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चौथ्या मजल्यावरील बेड क्रमांक २०३ वर त्याला भरती करण्यात आलं, मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत एकही डॉक्टर फिरकला नव्हता, असा दावा आदर्शने व्हिडिओत केला आहे.

कुटुंब देवदर्शनाला, तरुणाने मित्रासह आयुष्य संपवलं; घरातली आग विझवल्यावर गूढ उलगडलं
दुपारी दोन वाजता एक डॉक्टर आले, त्यांनी रुग्णाला तपासून लखनौला नेण्याचा सल्ला दिला. मात्र दुर्दैवाने त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांतच मुलाच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर माध्यमांनी चिमुकल्याला प्रश्न विचारले, तेव्हा त्याच्या तोंडून निघालेला प्रश्न सर्वांनाच सुन्न करुन गेला. ‘मला सांगा, अशी कोणती ट्रेन आहे, जी १० मिनिटांत लखनौला नेईल?’ असा प्रश्न आदर्शने रडत रडत विचारला. इतकंच नाही, तर आपल्या बाबांना परत आणण्याची याचनाही त्याने केली.

सरकारनं लग्न लावायचा प्रश्न बच्चू कडूंनी आदित्य ठाकरेंकडे पाहून विचारला का? फडणवीसांचा मिश्कील सवाल

‘आम आदमी पक्ष’ आणि काँग्रेस यांनी ट्विटरवरुन भाजप सरकारला प्रश्न विचारला आहे. ‘भ्रष्ट आणि निष्काळजी व्यवस्थेने निष्पाप मुलाचे पितृछत्र हिरावून घेतले. वडिलांच्या मृत्यूच्या 10 मिनिटे आधी डॉक्टरांनी त्यांना दहा मिनिटांत लखनऊला नेण्यास सांगितले. “लखनौला 10 मिनिटात कोणती ट्रेन पोहोचेल”? लखीमपूरमधील निरपराध लेकराच्या प्रश्नाचे उत्तर आरोग्य मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत कोण देणार?’ असा प्रश्न आम आदमी पक्षाने विचारला आहे.

पाहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here