गाझियाबाद : बायकोसोबत तो आरामात झोपला होता, पण ती प्रेमळ रात्र त्याच्यासाठी आयुष्यातली शेवटची रात्र असेल याची त्याला कल्पनाही नव्हती. बेडवर पतीसोबत एकत्र झोपलेल्या पत्नीने अचानक आपल्या प्रियकराला बोलावलं आणि यानंतर क्षणात घरात असं काही झालं की याचा कोणी विचारही करू शकणार नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

‘तू लवकर ये, आज तुझी कायमची सुटका होईल’ आणि मग थोड्याच वेळात खोलीमध्ये बंदुकीचा आवाज घुमला. गाझियाबादमध्ये या भयंकर कथेची लेखक पत्नीच होती. तिला तिच्या नवऱ्याकडून बदला घ्यायचा होता. त्यासाठी तिने हत्येचा कट रचला.

Crime Diary : रिप्लाय नाही दिला तर मारेन, सुसाईड नोटही रागात लिहली की पेनाची निब तुटली; मृत्यूचं भयानक गुढ

पत्नीचा पतीसाठीच खूनी खेळ…

शिवानी नावाच्या महिलेने नंदग्राम परिसरात पोलिसांना फोन करून पतीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. फोनवर माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. कपिल चौधरी असं मृत पतीचं नाव होतं. घरात त्याचा मृतदेह पडला होता, जवळच एक पिस्तूल पडली होती. कपिलच्या डोक्याच्या डाव्या बाजूला गोळी लागली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असता गोळी खूप जवळून झाडण्यात आली असल्याचं लक्षात आलं. यानंतर त्या रात्री कपिलने खरंच आत्महत्या केली होती का? याबद्दल पोलिसांना शंका होता. या घटनेनंतर कपिलची पत्नी शिवानी जोरजोरात रडत होती. पतीच्या निधनाने शोक करीत होती.

पतीची हत्या पण सांगितलं आत्महत्या…

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असता कपिल हा उजव्या हाताचा होता. त्यामुळे त्याने डाव्या हातामध्ये बंदूक पकडून गोळी कशी झाडली, अशी शंका पोलिसांनी आली. कारण, गोळी डोक्याच्या डाव्या बाजूने झाडली गेली होती. यानंतर पोलिसांना वेगळाच संशय येऊ लागला आणि संशयाची सुई थेट शिवानीकडे वळली. पोलिसांनी तिला याची कुनकूनही लागू दिली नाही आणि शिवानीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तिचे कॉल डिटेल्स काढले असता पोलिसांनी धक्कादायक माहिती हाती लागली.

Crime Diary: कंबरेच्या पट्ट्याने मरेपर्यंत मारलं, बॉडी फेकताना दगडच सरकला, आंबोली घाटानेच केला भयंकर न्याय

दारूच्या नशेत पतीचा झाला मृत्यू…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी अंकुश नावाच्या मुलाशी रोज तासनतास फोनवर बोलायची. या दरम्यान, कपिल चौधरीचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला असून त्याला गोळी झाडण्यापूर्वी ड्रग्ज देण्यात आल्याचं समोर आलं. हत्या झाली तेव्हा कपिल दारूच्या नशेत होता. त्याच्यासोबत काय चाललं आहे हे त्याला कळलंच नाही. या घटनेची कसून चौकशी केली असता दोघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिला आणि नंतर पोलिसांनी शिवानी आणि अंकुशला अटक केली.

Crime Diary: पतीचे ५, सासूचे ३ तुकडे; फ्रीजमध्ये गोठवले अन्…; भोळ्या चेहऱ्यामागे थरकाप उडवणारा खूनी खेळ

प्रियकरासह पतीची हत्या….

अंकुश शिवानीच्या घराजवळच मोबाईल शॉपी चालवायचा. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता संपूर्ण घटना उघडकिस आली. त्या रात्री शिवानीने पतीला अंमली पदार्थ मिसळून जेवण दिले आणि नंतर त्याच्यासोबत झोपली. कपिल जेव्हा गाढ झोपेत गेला तेव्हा तिने आपल्या प्रियकराला घरी बोलवलं आणि पतीला ठार करण्यास सांगितलं. शिवानीच्या सांगण्यावरून अंकुशने क्षणभरही विचार न करता शिवानीला गोळ्या झाडल्या. खून केल्यानंतर ही आत्महत्या वाटावी म्हणून त्यांनी त्याच्या मृतदेहाशेजारी बंदूक ठेवली.

पोलिसांनी वेळीच दखल घ्यायला हवी होती; लेकीच्या न्यायासाठी आई-बापाची आरोपींना फाशी देण्याची मागणी

पतीने चापट मारल्याचा घेतला बदला….

शिवानीला अटक केल्यानंतर ती पोलिसांना चकवा देण्यासाठी अनेक किस्से सांगत होती. अशात कपिल तिला खूप मारायचा. तो तिला रोज मारहाण करायचा आणि त्यामुळे तिचे अंकुशसोबत संबंध सुरू झाले. कपिलच्या अशा वागण्यामुळे ती त्याचा तिरस्कार करू लागली होती आणि तिला त्याला मारायचं होतं आणि म्हणूनच तिने त्याला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

Crime Diary : पत्नीच्या डोळ्यासमोर होतं सगळं पण फसली; पतीचा मित्र, रक्ताने माखलेले कपडे अन् धाड…धाड…धाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here