मुंबई : मुंबई शहरात ५०० चौ. फुटांच्या आतील घर असणाऱ्या मिळकत धारकांचा कर माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु पुणेकरांना देण्यात आलेली सवलत रद्द करुन त्याची वसुली करण्यात येत असल्याने पुणेकर नागरिकांत तीव्र असंतोषाची भावना आहे. हीच भावना लक्षात घेऊन राज्य शासनाने पुणे महापालिकेला वसुली थांबविण्याचे आदेश द्यावेत आणि पुणे शहरातील ५०० चौ. फुटाच्या आतील घरांना कर माफ करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

कसब्याचं मैदान मारल्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपला सहभाग नोंदवला. पुणेकर नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना कर माफीचा विषय लक्षवेधीच्या माध्यमातून रवींद्र धंगेकर यांनी सभागृहाच्या पटलावर आणला. ५०० चौरस फुटांचे घर असणाऱ्या मिळकत धारकांचा कर माफ करावा, ही मागणी राज्य सरकारने मान्य न केल्यास याविरोधात शहरात आंदोलन करु, असंही धंगेकरांनी सांगितलं.

निधी संपवायचा म्हणून निविदांचा धडाका पण कंत्राटदारांची थकलेली बिलं कोण देणार? पंधरा हजार कोटींची बिलं थकली..!
धंगेकर यांनी ‘लक्षवेधी’त काय म्हटलं?

पुणे महानगरपालिकेने घरमालकांना देण्यात येणारी मिळत करातील ४० टक्के सवलत रद्द केल्याने याचा फटका हजारो पुणेकरांना बसत आहे. राज्यात दिवसेंदिवस महागाई वाढत असून महागाईमुळे पुणेकरांवरीलही खर्चाचा बोजा वाढत आहे. त्यातच मिळकत करात देण्यात येणारी ४०% सवलत बंद झाल्यामुळे पुणेकरांना मोठा आर्थिक फटका बसतोय. १९७० सालापासून सन २०१८ पर्यंत मिळालेला सवलत व्याजासहित पुणेकरांकडून वसुल करण्याचे आदेश देण्यात आल्याने यासंदर्भात पुणे म.न.पा ने वसुली व व्याज घेण्यावर स्थगिती द्यावी असा ठराव करून शासनाकडे पाठविला असतानाही याबाबत शुध्दीपत्रक शासनाने अद्यापही काढलेले नाहीये.

आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा विधानसभेत विषय, फडणवीसांची मिश्किल टिप्पणी, आदित्य हसत हसत म्हणाले, धमकी देताय काय?
मुंबई शहरात ५०० चौ. फुटांच्या आतील घरांना सवलत दिली जाते. परंतु पुणेकरांना देण्यात आलेली सवलते रद्द करुन त्याची वसुली करण्यात येत असल्याने पुणे शहरातील नागरिकांत पसरलेली तीव्र असंतोषाची भावना लक्षात घेऊन राज्य शासनाने चौकशी करून सुरु असलेल्या वसुलीला स्थगित देऊन कर सवलत कायम करण्याची तसेच मुंबईच्या धर्तीवर पुणे शहरातील ५०० चौ. फुटाच्या आतील घरांना कर माफ करण्याबाबत करावयाची आवश्यक शासनाने करावी आण पुणेकरांना दिलासा द्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here