अकोला : कापसाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण पाहायला मिळत होती. परंतु, आज विदर्भातील कापसाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. तर, अकोल्याच्या बाजारात तुरीचे दर स्थिरावले आहेत. आज कापसाच्या दरात ४० रुपयांनी वाढ झाली आहे तर तुरीच्या दरात २२५ रुपयांनी घसरण झाली आहे. अकोल्याच्या बाजारात तुरीला जास्तीत जास्त ८ हजार ५०५ रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला. तसेच अकोटच्या कृषी बाजारात कापसाला जास्तीत जात ८ हजार ३३५ रूपांपर्यंत भाव होता.

अकोल्याच्या कृषी बाजारात १८ मार्च रोजी तुरीला ६ हजार ५०० पासून ८ हजार ४०० तर सरासरी भाव ७ हजार ४०० रूपयांपर्यत होता. या दिवशी तुरीची आवक ७२३ इतकी क्विंटल झाली होती. त्यानंतर २० मार्चला तुरीच्या दरात वाढ झाली असून तुरीचे दर ५ हजार ५०० पासून ८ हजार ७३० रूपयांपर्यत पोहचले होते. म्हणजेचं तुरीच्या दरात ३२३ रुपयांनी वाढ झाली होती. इथे ९६३ क्विंटल इतकी तुरीची खरेदी झाली. परंतु, कालच्या तुलनेत आज तुरीच्या दरात २२५ घसरण झाल्याचं दिसून आलं. त्यामुळ तुरीचे दर कमीत कमी दर ५ हजार ५०० पासून जास्तीत जास्त ८ हजार ५०५ रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे आले. तर सरासरी भाव ७ हजार ५०० रूपांपर्यंत कायम होता. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसाच्या तुलनेत तुरीच्या आवक मध्ये वाढ झाली असून आज २ हजार ४४५ क्विंटल इतकी तुरीची खरेदी झाली आहे. अकोटच्या बाजारात आज तुरीला ७ हजार ३९५ पासून ८ हजार २९५ रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला. तर, तुरीची आवक १ हजार २२५ इतकी झाली होती.

महाबळेश्वर हादरलं, माजी नगरसेवकांचा वाद, हॉकी स्टीकनं मारहाण, तलवारीनं हल्ला, कुमार शिंदेवर गुन्हा

कापसाच्या दरात ४० रुपयांनी वाढ

अकोला जिल्ह्यातील अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात आज ४० रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून कापसाच्या दरात सातत्याने घसरण झाल्याचं दिसून येत होतं. १६ मार्च रोजी अकोटच्या बाजारात कापासला ७ हजार ८७५ पासून ८ हजार २९५ रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव होता. आज कापसाच्या दरात ४० रुपयांनी वाढ झाली असून कापसाचे दर ७ हजार ७५० पासून जास्तीत जास्त ८ हजार ३३५ रूपांपर्यंत पोहोचले. अकोल्याच्या बाजारात आज कापसाला साधारणतः ७ हजार ७०० ते ८ हजार १०० तसेच सरासरी ७ हजार ७८० रूपयांपर्यत भाव होता. पण कापसाची आवक अतिशय कमी होती.

विजयाची गुढी उभारण्यासाठी भारताला करावी लागणार फक्त एकच गोष्ट, जाणून घ्या कोणती…

गोड बोलून काटा काढला, आलं धोक्याचं सरकार; ऐका या शेतकऱ्याची कथा, शाहीर लक्ष्मण हिरेंचं गाणं तुफान व्हायरल

अकोल्याच्या बाजारात हरभऱ्याला कमीत कमी ४ हजार १०० तर जास्तीत जास्त ४ हजार ८४० इतका भाव मिळाला असून सरासरी भाव ४ हजार ६०० इतका होता. अन् आज हरभऱ्याची आवक ३ हजार ८१ इतकी क्विंटल इतकी झाली. तसेच पांढऱ्या हरभऱ्याला ९ हजार ५२० रूपांपर्यंत भाव होता. लोकल गव्हाला १ हजार ९०० पासून जास्तीत जास्त २ हजार ५१० इतका असून सरासरी भाव २ हजार ३०० रूपये इतका होता. तर अकोटच्या बाजारात ४ हजार २५० पासून ४ हजार ८८५ रूपांपर्यंत प्रतिक्विंटर प्रमाणे हरभऱ्याला भाव मिळाला. इथे १ हजार ४४५ इतकी क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे.

‘कामाचा माणूस’ रवींद्र धंगेकरांची विधानसभेत पहिली लक्षवेधी, पुणेकरांसाठी महत्त्वाची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here