मुंबई: सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून राज्य सरकारवर निशाणा साधताना मुंबईतील सुरक्षिततेवर व पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी यांना शिवसेनेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ पोलिसांवर भरवसा नसेल तर सुरक्षा कवच सोडून द्या,’ असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.

सुशांतसिंहच्या आत्महत्येच्या चौकशीच्या प्रकरणानं आता राजकीय वळण घेतलं आहे. सुशांतसिंह प्रकरणात राज्य सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळंच देशभरातून मागणी होऊनही हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे दिले जात असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. त्याचवेळी मुंबईत तपासासाठी येणाऱ्या बिहार पोलिसांनाही सहकार्य केलं जात नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. मुंबईत नुकत्याच आलेल्या एका बिहारी पोलीस अधिकाऱ्याला महापालिकेनं क्वारंटाइन केल्यानंतर हा वाद आणखी पेटला आहे.

याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी आज एक ट्वीट केलं. ‘सुशांतसिंहच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीनं केला जात आहे, हे पाहता मुंबईनं माणुसकी गमावल्यासारखं वाटतंय. निष्पाप व स्वाभिमानानं जगणाऱ्या नागरिकांसाठी मुंबई सुरक्षित राहिली नसल्याचं अमृता फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मुंबई असुरक्षित असल्याचं सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे मुंबई पोलिसांवरही निशाणा साधला आहे.

अमृता यांच्या या ट्वीटला युवा सेनेचे सरचिटणीस यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांचं सुरक्षा कवच घेऊन फिरता आणि त्यांच्यावरच असे आरोप करता?,’ असा संतप्त सवाल वरुण सरदेसाई यांनी केला आहे. ‘मुंबई पोलिसांवर भरवसा नसेल तर हे सुरक्षा कवच सोडून द्या,’ असंही त्यांनी सुनावलं आहे. सरदेसाई यांच्या या ट्वीटमुळं हा वाद आणखी रंगण्याची चिन्हं आहेत.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

6 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here