शनिवारी फालदू कुटुंब जेनीबेनच्या मामाच्या घरी जेवायला गेलं होतं. जेनीबेन मुलांसह तिथेच राहिली, तर आशिष रात्री उशिरा आपल्या घरी परतला. मात्र तो आपला मोबाईल फोन तिथेच विसरला होता. रविवारी जेनीबेनने आपल्या मामेभावाकडून आशिषचा फोन घरी पाठवून दिला. मात्र बराच वेळ होऊनही आशिषने दार न उघडल्यामुळे जेनीबेनचा मामेभाऊ बुचकळ्यात पडला.
अखेरीस त्याने शेजारपाजारी चौकशी केली. तेव्हा आशिषला कोणीच बाहेर जाताना पाहिलं नव्हतं. त्यामुळे आशिषच्या जिवाचं बरं वाईट झाल्याच्या भीतीने सर्वांनी घराचा मुख्य दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आशिष घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. आशिषच्या मेहुण्याने पोलिसांना याची माहिती दिली. ओलपाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
रिलसाठी कारमधून नोटा फेकल्या; यूट्यूबरला पोलिसांनी केली अटक
जेनीबेनने काही दिवसांपूर्वी आशिषच्या हातून घडलेल्या एका अपघाताची माहिती पोलिसांना दिली. आशिष चालवत असलेल्या कारच्या धडकेत बाईकवरुन प्रवास करणाऱ्या एका दाम्पत्यासह त्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आशिषला अटक केली होती. नंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. या घटनेने आशिषच्या मनावर खोलवर जखम झाली होती. तो या धक्क्यातून कधीच सावरु शकला नाही, असं जेनीबेनने पोलिसांना सांगितलं. याच कारणावरुन त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे