प्राथमिक माहितीनुसार अवतार सिंह खांडा यानेच अमृतपाल सिंह याला ट्रेनिंग दिलं होतं. पंजाब पोलीस गेल्या काही दिवसांपासून अमृतपालसिंह खांडा यांचा शोध घेत आहेत. अवतार सिंह खाडा हा खलिस्तानी लिबरेशन फोर्सशी संबंधित असलेल्या कुलवंत सिंह खुखराना याचा मुलगा आहे.
अमृतपाल याला अवतार सिंह खांडा यानंच मिशन खलिस्तानसाठी ट्रेनिंग दिल्याची सूत्रांची माहिती आहे. १९ मार्चला भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात खलिस्तान समर्थकांनी गोंधळ घातला होता. तिथं खलिस्तान जिंदाबादचे नारे देण्यात आले. काही जण कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर जाऊन तिरंगा काढण्याचा प्रयत्न करत होते.
खांडा याचे संबंध पाकिस्तानच्या आयएएसआयशी असल्याचं सांगितलं जातं. बंदी असलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या परमजीत सिंह पम्मा याचा खांडा हा निकटवर्तीय असल्याचं बोललं जातं.
भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या बाहेर असलेला तिरंगा काढून खलिस्तानी झेंडा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतात ब्रिटनच्या राजनैतिक अधिकाऱ्यांकडे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. भारताकडून त्या प्रकरणीत सुरक्षेत चूक झाल्याचं सांगण्यात आलं होतं. भारतानं ब्रिटनच्या उच्चायुक्तांना विएन्ना कराराचं उल्लंघन झाल्याचं म्हटलं होतं.
ही घटना घडली त्यावेळी ब्रिटनचे उच्चायुक्त अॅलेक्झांडर डब्ल्यू एलिस भारताच्या दौऱ्यावर होते. एलिस यांनी या घटनेबद्दल ट्विट करुन इंडिया हाऊसमध्ये घडलेली घटना अपमानास्पद कृती असून ती अजिबात स्वीकारली जाणार नाही, असं म्हटलं.
सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?