अलिबाग : रायगड जिल्ह्यात अलिबाग येथील युनियन बँकेसह अनेक इमारतींमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणारा नथुराम रुपसिंग याची आठ दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह पालव स्मशानभूमी येथे आढळून आला होता. या हत्येमुळे अलिबाग येथे खळबळ उडाली होती. ही हत्या त्याचा चुलत भाऊ निलेश पवार यानेच हत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे त्याला त्याला अटक करण्यात आली आहे. अजून एका संशयिताचा शोध सुरू आहे. आर्थिक व्यवहारांच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

नथुराम याने नीलेश पवार या नातेवाईकाला बँकेत नोकरी लावण्यासाठी त्याच्याकडून १ लाख रुपये घेतले होते. त्याप्रमाणे कामदेखील मिळवून दिले. नीलेश सफाई कामगार म्हणून बँकेत काम करु लागला. त्याला नथूराम ६ हजार रुपये पगार देत असे. नथुरामने त्याच्या जागी नीलेश साफसफाईचे काम करणार असल्याचे बँकेला सांगून ठेवले होते. ही बाब महिन्यानंतर नीलेश याला समजल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्याला लक्षात आले होते. त्यामुळे त्याने पैसे परत मागण्यास सुरुवात केली.

वयाच्या ७२ व्या वर्षी प्लेबॉय बनायचे होते, सौंदर्यांच्या जाळ्यात अडकून ११ लाख रुपये गमावले, असे उघड झाले रहस्य
याच पैशाच्या वादातून नथुराम याची पालव स्मशानभूमीजवळ नेऊन हत्या करण्यात आली. हत्येनंतर निलेश हा त्याच्या नातेवाईकांसोबत खोटा खोटा शोक व्यक्त करत होता. शेवटी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत, त्याने नथुरामची हत्या केल्याचे कबूल केले. त्याच्या आणखी एक नातेवाईक साथीदाराचा शोध सुरु आहे.

याच पैशाच्या वादातून नथुराम याची पालव स्मशानभूमीजवळ नेऊन हत्या करण्यात आली. हत्येनंतर निलेश हा त्याच्या नातेवाईकांसोबत खोटा खोटा शोक व्यक्त करत होता. शेवटी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत, त्याने नथुरामची हत्या केल्याचे कबूल केले. त्याच्या आणखी एक नातेवाईक साथीदाराचा शोध सुरु आहे.

करोनामुळे नवा धोका! होऊ शकतो हा गंभीर परिणाम! जाणून घ्या काय आहे फेस ब्लाइंडनेस
अलिबाग येथील युनियन बँक कर्मचारी नथुराम पवार या सफाई कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली होती. अलिबाग तालुक्यातील सहाण पाले या बायपास रोड वरती त्याचा मृतदेह एका शेतात आढळून आला होता

नथुराम पवार हा अलिबाग येथील शास्त्रीनगर परिसरात राहणार होता तो तेरा मार्चपासून घरी आला नव्हता त्यामुळे त्याची शोधा शोध सुरू होती त्याच्या पत्नीने तो बेपत्ता झाल्याची तक्रार अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल केली होती अलिबाग पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र दुर्दैवाने त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह मिळाला होता.
ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तान्यांचा हल्ला, तिरंग्याचाही केला अपमान
या हत्येप्रकरणी संशयित आरोपी निलेश याला अलिबाग न्यायालयाने 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास अलिबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली, एपीआय जाधव, सुनील फड, अनिकेत म्हात्रे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here