हर्षद खान असं महिलेला मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत ४२ वर्षीय महिलेने निगडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबधित महिला ही पिंपरी चिंचवडमधील सिटी प्राईड इमारतीमध्ये असणाऱ्या ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये साफ – सफाई करण्याचे काम करते. मात्र, याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या आरोपी हर्षद खान याने गेल्या तीन महिन्यांपासून संबंधित महिलेचा पगार दिलेला नाही. महिलेने अनेकदा त्याच्याकडे पगाराची मागणी केली होती. मात्र, तो देण्यास टाळाटाळ करत होता. आज सकाळच्या सुमारास महिलेने पुन्हा आरोपीकडे पगार मागितला. यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. यावरून चिडलेल्या हर्षदने महिलेला मारहाण करत शिवीगाळ केली. या मारहाणीत महिलेच्या तोंडाला गंभीर मार लागला आहे.
घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मात्र, या घटनेनं महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांनी या महिलेला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे.