नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर आणि लखनऊसह देशातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.६ इतकी मोजण्यात आली असून भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाचे धक्के बराच वेळ जाणवत होते. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर भीतीने लोक घराबाहेर पडले. या भागामधील घरातील पंख्यांपासून ते दिवे आणि इतर वस्तूही वेगाने हलत होत्या. दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त लखनऊ, जम्मू-काश्मीर, पंचकुला आणि चंदीगडसह देशातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

या भूकंपाच्या धक्क्यांमुळे दिल्लीतील शकरपूर येथील एक इमारत कलल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.

नोकरी लावण्यासाठी १ लाख रुपये घेतले, फसवणूक झाल्याचे कळताच चुलत भावानेच केली भावाची हत्या
भूकंपाच्या धक्क्याने लोक बाहेर आले

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. साडेदहाच्या सुमारास झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने घरात बसलेले लोक घाबरले. जे घरात होते ते पटापट बाहेर आले. इतके जोरदार हादरे त्यांनी यापूव्री कधीच अनुभवले नसल्याचे अनेकांनी सांगितले. कार्यालयात काम करणाऱ्या लोकांनी सांगितले की, तिथे काम करताना लाईटचे पंखे आणि खुर्च्याही वेगाने हलत होत्या. या धक्क्यांमुळे तेही घाबरले.

वयाच्या ७२ व्या वर्षी प्लेबॉय बनायचे होते, सौंदर्यांच्या जाळ्यात अडकून ११ लाख रुपये गमावले, असे उघड झाले रहस्य
या भूकंपाच्या धक्क्यांबाबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानात या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.८ इतकी मोजली गेली. त्याच प्रमाणे या भूकंपाचे धक्के पाकिस्तानातील इस्लामाबाद, लाहोर आण पेशावर येथेही जाणवले, असे वृत्त एआरवाय न्यूजने दिले आहे.

दरम्यान, या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here