कोल्हापूर: महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोककला म्हणून लावणीची ओळख आहे. हीच लावणी अनेक चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आली आणि तिने अनेकांची मने जिंकली. काही दिवसांपूर्वी लोकांसमोर आलेल्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा ही लावणी अशीच लोकांना भुरळ घालणारी. अल्पावधीतच या लावणीने सर्वांच्या मन जिंकली. विशेष म्हणजे मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने देखील जोरदार लावणी सादर केली. यावर अनेक रिल्स आणि शॉर्ट व्हिडिओ होत आहेत.आता याच गाण्यावर कोल्हापुरातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनीचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल झाला असून तिने केलेल्या लावणीचा अमृता खानविलकर हिने व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

कोल्हापुरातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहूवाडी येथील अनुस्कुरा या गावात राहणारी हर्षदा कांबळे हिने चंद्रा या गाण्यावर केलेल्या डान्सची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. हर्षदा कांबळे ही कोल्हापुरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहे. ती दररोज तीन-चार किलोमीटर पायपीट करत आपलं शिक्षण पूर्ण करत आहे.

मॉलमध्ये अचानक बंदुकीतून गोळी सुटली, व्यक्ती थोडक्यात बचावली, पायाला लागली गोळी
हर्षदाला आहे नृत्याची आवड

हर्षदाला नृत्याची खूप आवड असून अभ्यासातदेखील ती तितकीच हुशार आहे शिवाय वक्तृत्व कलेमध्येदेखील ती आघाडीवर असून शाळेतील प्रत्येक समारंभात ती उत्साहाने सहभागी होते. गेल्या काही दिवसांपूर्वी जागतिक महिला दिन साजरी करण्यात आला यावेळी ति शिकत असलेल्या जिल्हा परिषद शाळेत ही महिला दिना निमित्त छोटासा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी तिने ‘चंद्रा’ या गाण्यावर डान्स केला आणि याचा व्हिडिओ तेथील शाळेतील शिक्षकांनी चित्रित करून सोशल मीडिया मध्ये अपलोड करत शेअर केला. हर्षालीने केलेला डान्स अल्पावधीतच व्हायरल झाला.

दिल्ली-एनसीआरपासून लखनऊपर्यंत भुकंपाचे तीव्र धक्के, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात
हर्षदाचा डान्स मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने पाहिला आणि फिदा झाली. अमृताने हर्षदाचा व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत चिमुकली चंद्रा असं कॅप्शन दिलंय. तसेच तिचे तोंड भरून कौतुक ही केलं असून तिच्या व्हिडिओ ला नागरिकांनी देखील जोरदार प्रतिसाद देत चांगले कमेंट्स दिले आहेत.

नोकरी लावण्यासाठी १ लाख रुपये घेतले, फसवणूक झाल्याचे कळताच चुलत भावानेच केली भावाची हत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here