सातारा : सातारा शहरातील आठवीत शिकणाऱ्या दोन मुलांनी एका पाठोपाठ एक आत्महत्या केली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या कुटुंबीयांकडे पोलीस चौकशी करत आहेत. जितेंद्र जगन वासकळे (वय १५, रा. चंदननगर, कोडोली, सातारा), अथर्व बसवराज दोडमणी ( वय १४, रा. सह्याद्री पार्क, शाहूपुरी, सातारा) अशी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, अथर्व दोडमणी हा साताऱ्यातील एका शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. मंगळवारी सकाळी नऊ वाजता त्याने घरात नाष्टा केला. त्यानंतर तो बाहेर निघून गेला. सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्या बंगल्याशेजारी असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये त्याने गळफास घेतल्याचे घरातील कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. यानंतर कॉलनीमध्ये एकच खळबळ उडाली.

तुम्हीही तोंडात बोट घालाल! कोल्हापूरच्या चिमुकल्या चंद्राची जोरदार चर्चा; अमृता खानविलकरने शेयर केला नृत्याचा व्हिडिओ
कुटुंबीयांनी अथर्वचा गळफास सोडवून त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अथर्व हा तापट स्वभावाचा होता. त्याच्या मनासारखे झाले नाही, तर तो चिडायचा, असं पोलिस सांगितले. मात्र त्याने कोणत्या कारणावरून आत्महत्या केली, हे समोर आले नाही.

दिल्ली-एनसीआरपासून लखनऊपर्यंत भुकंपाचे तीव्र धक्के, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात
आत्महत्येचे कारण अस्पष्ट

जितेंद्र वासकळे हा शहरातील एका शाळेमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. सोमवारी रात्री जेवण झाल्यानंतर त्याने त्याच्या खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रात्री साडेअकरा वाजता घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याने कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याचे स्पष्ट कारण अद्याप समोर आले नाही. त्याचे वडील एका कंपनीत नोकरी करतात, असे पोलिसांनी सांगितले.
नोकरी लावण्यासाठी १ लाख रुपये घेतले, फसवणूक झाल्याचे कळताच चुलत भावानेच केली भावाची हत्या
सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात या दोन्ही घटनांची नोंद झाली आहे. या हादरून टाकणाऱ्या दोन धक्कादायक घटना समोर आल्याने साताऱ्यात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here