वेगाने विकसित होत असलेल्या आणि विस्तारणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर शहरांची लोकसंख्याही वेगाने वाढत आहे. अ वर्गात मोडणाऱ्या या नगरपालिकांची महापालिका करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून प्रादेशिक आराखड्यात या नगरपालिकांचे महापालिकेमध्ये रूपांतर करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यासाठी अधिकचा भाग त्यात समाविष्ट करण्याचाही विचार असून, तत्कालीन कोकण विभागीय आयुक्तांनी याबाबत पाहणी करून राज्य सरकारला सादरीकरण केले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा प्रस्ताव मागे पडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून पालिकांमध्ये प्रशासकीय राजवट लागू असून हाच काळ महापालिका करण्यासाठी योग्य असल्याबाबत स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा केली जाते. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे बालेकिल्ले आहेत. या दोन्ही नगरपालिकांच्या महापालिका केल्यास त्याचा राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर लाभ होण्याची शक्यता आहे. त्यातच अंबरनाथ येथे नुकत्याच पार पडलेल्या शिव मंदिर फेस्टिवलसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही शहरांतील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी शहर विकासाबाबत चर्चा सुरू असताना, अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर या नगरपालिकांच्या महापालिका करण्याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाणून घेतले, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच महापालिकेबाबत मत विचारल्याने अनेक माजी नगरसेवक आणि स्थानिक वरिष्ठ नेत्यांनीही महापालिका करण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे या दोन्ही नगरपालिकांची आगामी काळात महापालिका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भिवंडीत बागेश्वर धामच्या मंदिर व आश्रमाचे धीरेंद्र कृष्ण शास्त्रीच्या हस्ते भूमिपूजन
Having read this I thought it was really informative.
I appreciate you taking the time and energy to put this short article together.
I once again find myself spending way too much time both reading and leaving
comments. But so what, it was still worth it!